News

ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा सरला आहे तरी मराठवाड्यात नांदेड जिल्हा वगळता इतर भागात पाऊस नाही. जर यंदा पाऊस झाला नाही तर मराठवाड्यात दुष्काळाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

Updated on 01 September, 2023 2:11 PM IST

छत्रपती संभाजीनगर

मराठवाड्यात देखील जून महिन्याने पावसाने चांगलीच हुलकावणी दिली आहे. किमान १५ जूनला तरी पेरण्या होतील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मराठवाड्यात जून महिना पूर्ण सरला तरी पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.

ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा सरला आहे तरी मराठवाड्यात नांदेड जिल्हा वगळता इतर भागात पाऊस नाही. जर यंदा पाऊस झाला नाही तर मराठवाड्यात दुष्काळाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तसंच पाण्याअभावी आहेत ती पिके देखील शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, आतापर्यंत फक्त ३३६ मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. तर गतवर्षी आज घडीला मराठवाड्यात ५२८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे नागरिकांची दिवसेंदिवस चिंता अधिकच वाढत चालली आहे. 

English Summary: Rain returns to Marathwada Double sowing crisis on farmers
Published on: 07 August 2023, 06:27 IST