News

पावसाने उघडीप दिल्याने राज्यात उन्हाचा चटका आणि उकाड्यात चांगलीच वाढ झाली.

Updated on 01 September, 2022 9:03 PM IST

पावसाने उघडीप दिल्याने राज्यात उन्हाचा चटका आणि उकाड्यात चांगलीच वाढ झाली. यातच पावसाला पोषक हवामान झाल्याने अनेक भागात विजांसह पावसाने पुनरागमन केले आहे. आज (ता.३१) कोकण,मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज आहे. तर उर्वरित राज्यात कमाल तापमान आणि उकाड्यातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा हिमालयाच्या पायथ्याकडे कायम आहे.A low pressure belt which forms the base of the monsoon continues towards the foothills of the Himalayas. अंतर्गत तमिळनाडू आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यापासून पश्चिम विदर्भापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे राज्यात ढगाळ हवामान होत असून, विजांसह पावसाला पोषक हवामान होत आहे.पावसाची उघडीप दिल्यानंतर राज्यात उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाली आहे. यातच पावसाला

पोषक हवामान झाल्याने विदर्भात अनेक ठिकाणी तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. ३१) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पूर्व विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात कमाल तापमान आणि उकाड्यातील वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे.विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :कोकण : रायगड, रत्नागिरी, सिंधदुर्ग

मध्य महाराष्ट्र : जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूरमराठवाडा : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड विदर्भ : अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमंगळवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) : कोकण : कुडाळ, सावंतवाडी प्रत्येकी १०मध्य महाराष्ट्र : कवठे महांकाळ, मालेगाव प्रत्येकी ३०, रावेर १०

मराठवाडा : उमरगा ४०, धर्माबाद, घनसांगवी, फुलंब्री प्रत्येकी २०, नायगाव खैरगाव, पाथरी, अर्धापूर प्रत्येकी १०विदर्भ : सावळी, मुल प्रत्येकी ५०, आरमोरी, धानोरा प्रत्येकी ४०, एटापल्ली, गडचिरोली, घाटंजी, राळेगाव, सालकेसा, आर्णी, सडकअर्जूनी, कोर्ची, पांढरी कवडा, मोरगाव अर्जुनी, मारेगाव प्रत्येकी ३०, सेलू, परतवाडा, देसाईगंज, वरोरा, समुद्रपूर, दिग्रस, गोरेगाव, आष्टी, कुरखेडा, आमगाव, हिंगणघाट, कळंब, चांदूर रेल्वे, वरूड, महागाव प्रत्येकी २०.

English Summary: Rain returns in many parts of the state
Published on: 01 September 2022, 09:03 IST