News

राज्यातील वातावरणात पुर्वमोसमी पाऊस पडण्यासाठी पोषक हवामान तयार होत आहे. यामुळे राज्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे शेतकरी राजा चिंतेत पडला आहे.

Updated on 30 March, 2020 10:26 AM IST


राज्यातील वातावरणात पुर्वमोसमी पाऊस पडण्यासाठी पोषक हवामान तयार होत आहे. यामुळे राज्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे शेतकरी राजा चिंतेत पडला आहे. काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होत आहे. शनिवारी मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी हलक्या प्रतिचा पाऊस झाला. दरम्यान आजही मध्य महाराष्ट्र, विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाड्यात विजांसह हलक्या प्रतिच्या पावसाची शक्यता आहे.

मंगळवारपासून राज्याच्या बहुतांशी भागात उन्हाचा पार वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील काही भागात पाऊस झाला असलता तरी काही भागात ढगाळ हवामानासह उष्ण व दमट हवामान असल्याने उकाड्यात वाढ झाली होती. अनेक ठिकाणी तापमान ३६ ते ३९ अंशांदरम्यान आहे. त्यामुळे चटका वाढला असून उन्हाची झळ अनुभवायस मिळत आहे. रविवारी सोलापूर व चंद्रपूर येथे ३९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उद्यापासून तापमानात काहीशी वाढ होण्याची शक्यता आहे. मालेगाव आणि नाशिक येथे रविवारी ३४.६ सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दक्षिण छत्तीसगडपासून विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक, उत्तर केरळपर्यंत कमी हवेच्या दाबाचा पट्टा कायम आहे. अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातून होत असलेल्या बाष्पाच्या पुरवठ्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण होत आहे.

English Summary: rain possibility in center Maharashtra and vidrabha
Published on: 30 March 2020, 10:26 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)