रत्नागिरी
रत्नागिरीत सुरु असलेल्या जोराच्या पावसामुळे वाशिष्टी नदी आणि खेडमधील जगबुडी नदी इशारा पातळीवरुन वाहू लागल्या आहेत. त्यामुळे या नदीकाठच्या गावांना सतर्कचा इशारा देण्यात आला आहे. तसंच चिपळूणमध्ये एनडीआरएफचं पथक देखील दाखल आहे.
राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. कोकणासह मध्ये महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. रायगड, पालघर, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांसाठी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट दिला आहे.
दरम्यान, मुसळधार पाऊस पडणाऱ्या भागातील नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. तसंच वाशिष्टी नदीपात्र परिसरात न जाण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.
Published on: 19 July 2023, 01:01 IST