News

सोमवारपासून ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप राहणार आहे. त्यामुळे परतीच्या मॉन्सूनला माघार घेण्यासाठी पोषक वातावरण तयार होत असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे. राज्यातील पावसाचा जोर कमी होऊ लागला आहे.

Updated on 24 October, 2020 11:01 AM IST


सोमवारपासून ढगाळ हवामानासह पावसाची  उघडीप राहणार आहे. त्यामुळे परतीच्या मॉन्सूनला माघार घेण्यासाठी पोषक वातावरण तयार होत असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे. राज्यातील पावसाचा जोर कमी होऊ लागला आहे. एक -दोन दिवसात राज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस पडणार आहे. सोमवारपासून ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप राहणार आहे.

त्यामुळे परतीच्या मॉन्सूनला माघार घेण्यासाठी  पोषक वातावरण तयार होत असल्याचे हवामान विभागाने सांगितले. गेल्या तीन ते चार दिवसापुर्वी अरबी समुद्राच्या पश्चिममध्य भागात चक्रिय वाऱ्याची स्थिती तयार झाली होती. ती स्थिती अजूनही कायम आहे. त्याचा  परिणाम  कोकण व महाराष्ट्रातील काही भागावर होत असल्याने तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. आज ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. उद्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पुणे , कोल्हापूर, सातारा, सांगली  या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी  मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. तर मराठवाडा काही अंशी ढगाळ हवामान राहणार असून विदर्भात पावसाची उघडीप राहिल.  सध्या राज्यातील काही भागात ऊन पडत आहे, त्यामुळे उकाड्यात वाढ झाली आहे. परिणाणी कमाल तापमानात वाढ झाली आहे. दरम्यान जळगाव येथे  ३५.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

English Summary: Rain in some parts of Central Maharashtra in a couple of days
Published on: 24 October 2020, 11:01 IST