News

बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होत आहे. नैऋत्य भागात समुद्रसपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यामुळे विदर्भात आजपासून तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Updated on 26 August, 2020 7:55 AM IST


बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होत आहे. नैऋत्य भागात समुद्रसपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यामुळे विदर्भात आजपासून तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अरबी समुद्राच्या वायव्य भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून १.५ आणि ४.५ किलोमीटर उंचीवर आहे. मात्र स्थिती अधिक सक्रिय नसल्याने पावसाचा जोर कमी झाला आहे. त

सेच रायलसिमा ते दक्षिण तामिळनाडू दरम्यान दक्षिण - उत्तर कमी दाबाचा पट्टा आहे. हा पट्टा समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. राजस्थानच्या नैऋत्य भागात कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्याचे रुपांतर चक्राकार वाऱ्यांमध्ये होण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसांत या क्षेत्राची तीव्रता कमी होईल. मॉन्सूनची आस असलेला पट्टा राजस्थानच्या नैऋत्य भागापासून ते बंगालच्या उपसागरपाच्या उत्तर भागापर्यंत सक्रिय आहे. येत्या काही दिवसात कोकणातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. घङाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार पाऊस पडेल. दरम्यान गेल्या  पंधरा ते वीस  दिवस मध्य महाराष्ट्रातील  सर्वच जिल्ह्यांमधील  विविध  भागांत चांगला  पाऊस झाला आहे.  सध्या  तूर, कापूस, बाजरी ही पिके  वाढीच्या अवस्थेत  आहेत. बाजरी पीक कणसाच्या अवस्थेत आहेत. अती पावसामुळे मूग, उडीद पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.  अनेक ठिकाणी भात पीक जोमात आहेत. पुणे , सातारा, सांगली, सोलापूर, तसेच खानदेशातली सर्व जिलह्यांत आंतरमशागतीची कामे सुरू झाली आहेत. 

नाशिक जिल्ह्यात पेरण्या मागील वर्षाच्या तुलनेत चांगल्या आहेत. मात्र पश्चिम  पट्ट्यात भात लागवी अपेक्षित प्रमाणात होऊ शकल्या नाहीत.  दरम्यान कसमादे पट्ट्यातील कळवण, सटाणा, तालुक्यातील काही भागांतील पिकांना  पावसाचा फटका बसल्याने नुकसान झाले आहे.  

English Summary: Rain forecast in Vidarbha from today - Meteorological Department
Published on: 26 August 2020, 07:55 IST