जळगाव
खानदेशात मागील चार-पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरुच आहे. पावसामुळे शेती कामे खोळबंली असून पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे.
पाऊस थांबत नसल्याने तणनाशकांची फवारणीदेखील शेतकरी करू शकत नसल्याचे दिसत आहे. पाऊस असाच सुरू राहील्यास पिकहानी आणखी वाढेल, अशीही भिती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
नंदुरबारातील अक्कलकुवा तालुक्यातील देहली प्रकल्पही १०० टक्के भरला असून, त्याची जलपातळी १९७ मिटरवर पोचली आहे. तसेच शहादामधील सुसरी, दरा प्रकल्पातील जलसाठाही वाढला आहे.
दरम्यान, आजही राज्याच्या बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली आहे. काही भागात पावसाचा जोर जास्त होता. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात ठिकठिकाणी जोरदार पाऊस पडला. इतर भागात मात्र पावसाची उघडीप पाहायला मिळाली.
Published on: 25 July 2023, 05:38 IST