News

आज दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.  मध्य महाराष्ट्र, मराठावाड्यात गारपीट होण्याचा इशाराही  हवामान विभागाने दिला आहे. राज्यात पुर्व मोसमी पावसाला पोषक वातावरण तयार होत असल्याने ढग दाटून येत आहेत.

Updated on 25 March, 2020 9:45 AM IST


आज दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.  मध्य महाराष्ट्र, मराठावाड्यात गारपीट होण्याचा इशाराही  हवामान विभागाने दिला आहे.  राज्यात पुर्व मोसमी पावसाला पोषक वातावरण तयार होत असल्याने ढग दाटून येत आहेत.   दरम्यान राज्यात उन्हाचा चटकाही वाढला असून कमाल तापमानत वाढ होत आहे.  बंगालच्या उपसागरावरून होत असलेला बाष्पाचा पुरवठा, विदर्भापासून तमिळनाडूपर्यंत असलेली खंडित वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे राज्यात वादळी पावसाची शक्यता आहे. अनेक भागांत जोरदार वारे, विजा, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

दरम्यान राज्यातील तापमानात वाढ झाली आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे उच्चांकी ३८.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर बऱ्याच ठिकाणी तापमानाच पारा ३५ ते ३६ अंशादरम्यान असल्याने उन्हाच्या झळा लागत आहेत.   मालेगावात ३६.२ आणि जळगावमध्ये  ३६.४ अंश सेल्सिअस तापमान होते. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यात गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर विदर्भातही मेघगर्जना, विजांसह पाऊस पडण्याचा शक्यता आहे.

English Summary: Rain and hail storm possibility in state
Published on: 24 March 2020, 10:54 IST