नवी दिल्ली
कॉग्रेस नेते राहूल गांधी यांनी सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाल आहे. मोदी आडनावाच्या मानहाणीप्रकरणी मिळालेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राहूल गांधी यांना पुन्हा त्यांची खासदारकी मिळणार आहे.
मोदी आडनावाची मानहानी केल्याप्रकरणी राहुल गांधी यांना गुजरातच्या न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली होती. त्यामुळे या निर्णयाविरोधात राहूल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने आता राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना आता त्यांची खासदारकी पुन्हा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गुजरात न्यायालयाने राहुल गांधींना सुनावलेल्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. हे प्रकरण एका व्यक्तीच्या आधिकाराबद्दलचं नसून मतदारांच्या अधिकारांशी संबंधित असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावण्यात आलेल्या शिक्षेवर ताशेरे ओढले आहेत.
दरम्यान, यापुढे सार्वजनिक जीवनात राहूल गांधींनी जबाबदारपणे वागण्याची अपेक्षा आहे. तसंच राहुल गांधींना जास्तीत जास्त शिक्षा दिल्याने एक मतदारसंघ प्रतिनिधित्वाविना राहील हे लक्षात घेण्यासारखं वाटत नाही का? असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावण्यात आलेल्या शिक्षेबद्दल बोलताना व्यक्त केलं.
Published on: 04 August 2023, 02:11 IST