News

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात निषेध नोंदवत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर टीका केली. रविवारी पंजाबमधील रॅलीत राहुल गांधी यांना सहभाग घेतला होता, त्यानंतर झालेल्या सभेत राहुल गांधी यांनी सरकाराच्या नव्या कायद्यावर टीका केली.

Updated on 05 October, 2020 6:42 PM IST

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात निषेध नोंदवत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर टीका केली. रविवारी पंजाबमधील रॅलीत राहुल गांधी यांना सहभाग घेतला होता, त्यानंतर झालेल्या सभेत राहुल गांधी यांनी सरकाराच्या नव्या कायद्यावर टीका केली. या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी राहुल गांधी रविवारी पंजाब मध्ये दाखल झाले होते. कोविंड महामारीच्या काळात या कायद्यांची अंमलबजावणी करण्याची काय गरज होती? असा प्रश्न त्यांनी केला. त्यांनी शेतकऱ्यांना हमी देताना राहुल गांधी म्हणाले की, जेव्हा काँग्रेस सत्तेवर येईल तेव्हा आम्ही हे तीन काळे कायदे रद्द करून कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ. शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आणि समर्थनार्थ राहुल तीन दिवस येथे ट्रॅक्टर रॅली करणार आहेत. राहुल गांधी यांच्या समवेत पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह, काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल आणि नवज्योत सिंग सिद्धू होते.

 याप्रसंगी बोलताना राहुल गांधी म्हणाले की,  या कायद्याविषयी सभागृहांमध्ये उघडपणे चर्चा करण्यात आली नाही? राहुल यांनी म्हटले की तर एखादा कायदा अंमलात आणायचा असेल तर तुम्ही आधी राज्यसभा आणि लोकसभेत यावर चर्चा केली पाहिजे होती. पंतप्रधानांचे म्हणणे आहे की हे कायदे हे शेतकरी हितासाठी तयार केले आहेत. जर असे होते तर सभागृहात उघडपणे चर्चा का झाली नाही,  असा प्रश्न राहुल यांनी सरकारला विचारला.  जर शेतकरी यामुळे खुश असेल तर तो देशभर का आंदोलन करीत आहे? पंजाब मधील प्रत्येक शेतकरी या विधेयकाला विरोध करत आहेत, असाही प्रश्न त्यांनी सरकारला विचारला.

 मोगा येथील रॅली पूर्वी राहुल म्हणाले की हे कायदे म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक आहे. या कायद्याच्या मदतीने २३ अब्जाधीशांची नजर शेतकऱ्यांच्या जमिनीवर पिकांवर आहे. ते पुढे म्हणाले की, सध्याच्या व्यवस्थेत काही त्रुटी असतील तर त्या बदलण्याची गरज आहे.  पण ती नष्ट करण्याची गरज नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते नष्ट करायचे आहे.  या कायद्याच्या विरोधात पंजाब हरियाणामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी आंदोलने होत आहेत. महाराष्ट्र सुद्धा याला अपवाद नाही.

English Summary: Rahul Gandhi opposes new agricultural laws, says repeals after coming to power
Published on: 05 October 2020, 06:42 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)