News

खरीप हंगामात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते, याची नुकसान भरपाई व्हावी या उद्देशाने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाकडे विशेष लक्ष केंद्रित केले. सध्या रब्बी हंगामातील पिके जोमात आहेत, खानदेशातील धुळे जिल्ह्यातही रब्बी हंगामातील पिके जोमदार वाढीत आहेत. रब्बी हंगामात पिकांसाठी पोषक वातावरण असल्याने शेतकऱ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. शेतकऱ्यांना खरीप हंगामात झालेले नुकसान रब्बी मधून भरून काढता येईल अशी आशा होती मात्र आता शेतकऱ्यांची ही आशा फोल ठरेल की काय? अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Updated on 18 February, 2022 11:05 PM IST

खरीप हंगामात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते, याची नुकसान भरपाई व्हावी या उद्देशाने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाकडे विशेष लक्ष केंद्रित केले. सध्या रब्बी हंगामातील पिके जोमात आहेत, खानदेशातील धुळे जिल्ह्यातही रब्बी हंगामातील पिके जोमदार वाढीत आहेत. रब्बी हंगामात पिकांसाठी पोषक वातावरण असल्याने शेतकऱ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. शेतकऱ्यांना खरीप हंगामात झालेले नुकसान रब्बी मधून भरून काढता येईल अशी आशा होती मात्र आता शेतकऱ्यांची ही आशा फोल ठरेल की काय? अशी भीती व्यक्त केली जात आहे.

रब्बी हंगामातील पिकांसाठी निसर्गाची कृपा असली तरी सुलतानी दडपशाहीमुळे व शेतकरी विरोधी महावितरण यामुळे रब्बी हंगामातील पिकांना मोठा विपरीत परिणाम भोगावा लागत असल्याचे बघायला मिळत आहे. राज्यात सर्वत्र सध्या उन्हाचा कडाका वाढला आहे, धुळे जिल्ह्यातही आता कडाक्याचे ऊन चटकत असल्याचे बघायला मिळत आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना आता पाण्याची नितांत गरज आहे, रब्बी हंगामातील पिकांना वेळेवर पाणी दिले गेले तरच उत्पादनात वाढ होईल असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे, मात्र मायबाप महावितरण शेतकऱ्यांच्या अडचणींकडे लक्ष द्यायला तयार नाही. सध्या धुळे जिल्ह्यात महावितरणकडून रात्री विद्युत पुरवठा पुरवला जात असून दिवसा विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे, त्यामुळे शेतकऱ्यांवर असलेले संकटांची मालिका अजून तरी पूर्णविराम घ्यायला तयार नाही असं बघायला मिळत आहे. रब्बी हंगामातील पिके जोमदार वाढीच्या अवस्थेत असताना राज्यात सर्वत्र केवळ सात तास विद्युत पुरवठा केला जात आहे, सात तास विद्युत पुरवठा तोही रात्रीचा, त्यामुळे शेतकऱ्यांना जीवावर खेळून रात्री-अपरात्री उठून पिकांना पाणी द्यावे लागत आहे.

त्यामुळे धुळे जिल्ह्यातील शेतकरी मायबाप महावितरणकडे सध्या मिळत असलेला विद्युत पुरवठा सुरळीत ठेवा मातृत्व दिवसा द्या अशी मागणी करीत आहेत. परंतु मायबाप महावितरण कधी नव्हे तो नियमांचा धाक दाखवत शेतकऱ्यांच्या अडचणींना केराची टोपली दाखवित आहेत.

रब्बी हंगामात पिकांच्या वाढीसाठी पोषक वातावरण असल्याने रब्बीची पिके जोमदार वाढत आहेत. मध्यंतरी आलेल्या अवकाळी पाऊसाचा काळ वगळता रब्बी हंगामातील पिकांना चांगले पोषक वातावरण बघायला मिळाले. पोषक वातावरण असल्याने सध्या रब्बीतील पिके जोमदार वाढत आहेत, असे असले तरी कडाक्याच्या उन्हात पिकांना पाणी भरणे गरजेचे आहे. मात्र महावितरण एक आठवडा दिवसा आणि एक आठवडा रात्री असा विद्युत पुरवठा पूरवित आहे, यामुळे महावितरणला नियोजन आखणे सोपे आहे मात्र शेतकऱ्यांचा यामुळे तोटा होत आहे.

शेतकऱ्यांच्या मते, जेव्हा दिवसा विद्युत पुरवठा असतो तेव्हा सर्व शेतकऱ्यांचे एकाच वेळी पाणी भरणे असल्याने विद्युत पुरवठा खंडित होत असतो, त्यामुळे ज्या आठवड्यात दिवसा विद्युत पुरवठा दिला जातो त्या आठवड्यात शेतकर्‍यांना पिकांना पाणी देणे शक्य होत नसते. या परिस्थितीमुळे रब्बी हंगामातील पिकांना वेळेवर पाणी दिले जात नाहीये त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विद्युत पुरवठा टाईम टेबल मध्ये मोठा अमुलाग्र बदल करून दिवसा विद्युत पुरवठा सुरळीत सुरू राहण्यासाठी तोडगा काढणे गरजेचे असल्याची मागणी केली आहे.

English Summary: Rabbi Season: Power supply is smooth at night and uninterrupted during the day; Adverse effects on rabi season crops
Published on: 18 February 2022, 11:05 IST