News

आताच्या युगात पाहायला गेले तर सर्व औषधीयुक्त दिसत आहे आणि त्यामुळे दिवसेंदिवस आरोग्य विषयक समस्या वाढत चाललेल्या आहेत आणि ज्यावेळी आपले आरोग्य बिघडते त्यावेळी नागरिकांना आठवण येते ती म्हणले पौष्टिक आहाराची. पौष्टिक धान्य जर आपण आहारात घेतले तर आपल्याला आरोग्यविषयक कोणतीही समस्या नसते. या सर्व पौष्टिक धान्यांपैकी एक ज्याला किनोवा असे म्हणतात.

Updated on 16 September, 2021 2:15 PM IST

आताच्या युगात पाहायला गेले तर सर्व औषधीयुक्त दिसत आहे आणि त्यामुळे दिवसेंदिवस आरोग्य विषयक समस्या वाढत चाललेल्या आहेत आणि ज्यावेळी आपले आरोग्य बिघडते त्यावेळी नागरिकांना आठवण येते ती म्हणले पौष्टिक आहाराची. पौष्टिक धान्य जर आपण आहारात घेतले तर आपल्याला आरोग्यविषयक कोणतीही समस्या नसते. या  सर्व  पौष्टिक  धान्यांपैकी  एक ज्याला किनोवा असे म्हणतात.

क्विनोआ मध्ये अंडी आणि गाईच्या दुधापेक्षा सुद्धा जास्त लोह असते:

खूप कमी लोकांना(people) याविषयी माहिती आहे की २०१३ हे वर्ष संयुक्त राष्ट्रांच्या कृषी व अन्न संघटनेने क्विनोआ वर्ष म्हणून जाहीर केले होते. या घोषित केलेल्या वर्षाचे एक असे उद्देश म्हणजे यामुळे नागरिकांना या पिकाचे महत्व समजेल. किनोवा याला मदर ग्रेन असेही म्हणतात. किनोवा मध्ये अंडी आणि गाईच्या दुधापेक्षा सुद्धा जास्त लोह असते.पीक संशोधनाही जोडलेले जे शास्त्रज्ञ आहेत त्यांचे असे मत आहे की क्विनोआ हे पीक रब्बी पीक आहे जे की हे पीक शरद ऋतू मध्ये घेतले जाते. क्विनोआ या धान्याची बियाणे पांढरी, गुलाबी तसेच हलकीशी तपकिरी रंगाची असतात. राजगिरा प्रमाणेच क्विनोआ ला धान्याच्या श्रेणी मध्ये ठेवले जातात. अगदी प्राचीन काळापासून आपल्या देशात याला हिरव्या पालेभाज्या आणि अन्नधान्य म्हणून  वापर  केला जातो.

हेही वाचा:टोमॅटो नंतर रस्त्यावर शिमला मिरचीचा चिखल, स्वयं राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांच्या जिल्ह्यात अशी परिस्थिती

हे आहे वैशिष्ट:

कृषी शास्त्रांज्ञ चे असे मत आहे की क्विनोआ हे धान्य नागरिकांनी खाल्ले पाहिजे जसे की क्विनोआमुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्या उदभवत नाहीत आणि निरोगी आयुष्य  मिळते  आणि यामुळे क्विनोआ ला निरोगी तसेच पवित्र धान्य मानले जाते. क्विनोआ हे पीक कमी पाण्यात तसेच हलक्या प्रतीच्या जमिनीत आणि प्रतिकूल परिस्थितीत चांगल्या प्रमाणात येते आणि उत्पादन सुद्धा मोठ्या प्रमाणात भेटते. क्विनोआ हे पीक लहान तसेच अल्पभूधारक शेतकरी वर्गाला चांगले वरदान म्हणून पाहिले जाते.

कसे आहे क्विनोआचे उत्पादन:

कृषी व अन्न संघटनेच्या मते क्विनोआ चे क्षेत्र जगात १,७२,२३९  एवढ्या हेक्टर वर  आहे यामधून ९७, ४१० टन उत्पादन  निघते. २०१५ मध्ये क्विनोआ चे क्षेत्र १,९७,६३७ हेक्टर वर  जाते तर यामधील उत्पादन १,९३, ८२२ टन भेटले होते. क्विनोआ  ला इतर धाण्यापेक्षा अधिक  अधिक पौष्टिक धान्य मानले जाते. क्विनोआ मध्ये अधिक प्रथिने असल्याने  याला  भविष्यातील  सुपर ग्रेन असेही म्हणले जाते. क्विनोआ ची ज्यावेळी तुम्ही लागवड करता त्यावेळी त्याला विशेष हवामानाची गरज नसते आपण आपल्या देशाचे हवामान यासाठी अनुकूल आहे.

क्विनोआ मध्ये काय आहे?

फायबर मक्याच्या दुप्पट तसेच तांदळाच्या दुप्पट आणि चरबी घवाच्या तिप्पट क्विनोआ मध्ये प्रथिने असते. क्विनोआ च्या बियाणे मध्ये तुरट पदार्थ असतो जो  आपल्या  आरोग्यासाठी  चांगला असतो जे की याचे प्रमाण ०.२ टक्के ते ०.४ टक्के असते. क्विनोआ खाण्याच्या आधी किंवा त्याचे उत्पादन बनण्यापूर्वी त्याचा बी पासून पृष्ठभाग काढणे गरजेचे आहे.

English Summary: Quinoa is the most nutritious grain in the world, also widely discussed internationally
Published on: 16 September 2021, 02:14 IST