News

पुणे शहरापासून जवळ असणारे मुळशी तालुल्यातील गावे ही जलदरीत्या शहरीकरणाकडे ओळली आहेत. मात्र तरी सुद्धा त्या तालुक्यातील शेतकरी अजूनही आपल्या शेतीमध्ये विविध प्रयोग करत असतात. मुळशी तालुका हा भातासाठी प्रसिद्ध आहे जे की या तालुक्यातील लवळे, नांदे, चांदे तसेच मुलखेड ही सर्व गावे मिळून जवळपास ४५० हेक्टर क्षेत्र हे भाताचे आहे. या गावातील शेतकरी वर्गाला बीजोत्पादन तसेच अर्थकरणाचे महत्व पटले असल्यामुळे त्यांनी शेतीवर भर दिलेला आहे. तर २०१६ मध्ये राधाबाई ऍग्रो कंपनी ची स्थापना केली.

Updated on 21 May, 2022 5:25 PM IST

पुणे शहरापासून जवळ असणारे मुळशी तालुल्यातील गावे ही जलदरीत्या शहरीकरणाकडे ओळली आहेत. मात्र तरी सुद्धा त्या तालुक्यातील शेतकरी अजूनही आपल्या शेतीमध्ये विविध प्रयोग करत असतात. मुळशी तालुका हा भातासाठी प्रसिद्ध आहे जे की या तालुक्यातील लवळे, नांदे, चांदे तसेच मुलखेड ही सर्व गावे मिळून जवळपास ४५० हेक्टर क्षेत्र हे भाताचे आहे. या गावातील शेतकरी वर्गाला बीजोत्पादन तसेच अर्थकरणाचे महत्व पटले असल्यामुळे त्यांनी शेतीवर भर दिलेला आहे. तर २०१६ मध्ये राधाबाई ऍग्रो कंपनी ची स्थापना केली.

कंपनीची वाटचाल :-

राधाबाई ऍग्रो कंपनीचे ९५ शेतकरी(farmer) सभासद आहेत जे की यामधील २० ते २५ सभासद माध्यमातून भात बीजोत्पादन कार्यक्रम यशस्वी राबवता येतो. मुळशीचे माजी कृषी अधिकारी शांताराम रायकर हे या राधाबाई ऍग्रो कंपनीचे संस्थापक संचालक आहेत. सुरुवातीच्या काळात एक एकरावर बीज उत्पादन घेण्याचे निश्चित झाले जे की यामध्ये सुदाम रानवडे, सोपान ढमाले, तानाजी रानवडे, बाजीराव पवार, भिकाजी तापकीर, श्रीधर सातव, रामचंद्र सातव या लोकांचा अधिकार राहिला. महात्मा फुले कृषी विद्यापीठातून इंद्रायणी वाणाचे पायाभूत बियाणे उपलब्ध केले. गादीवाफे तयार करून रोपे लावण्यात आली जे की यामुळे मरचे प्रमाण कमी झाले आणि आंतरमशागत सोपी झाली.

हेही वाचा:वर्धा जिल्ह्यातील शेतकरी आनंदात! शेतकऱ्यांना भेटली 470 कोटी रुपयांची कर्जमाफी, वाचा सविस्तर

चारसूत्री लागवड तंत्रज्ञान :-

१. सर्वात पहिले सूत्र म्हणजे भातपिकांच्या अवशेषांचा वापर केला.
२. त्यानंतर गिरीपुष्प हिरवळीच्या खताचा चिखळणी वेळी वापर केला.
३. रोपांची नियंत्रितपणे लागवड केली.
४. सर्वात शेवटी म्हणजे युरिया डीएपी ब्रिकेटसचा वापर केला.

बीज प्रक्रिया, तपासणी व साठवणूक :-

१. एकदा की बियाणे तयार झाली की त्यानंतर ती स्वच्छ करणे आणि नंतर शास्त्रीय प्रक्रिया पार पडल्यानंतर त्याचे प्रमाणीकरण अधिकारी वर्गाद्वारे तपासणी करणे.
२. पुणे येथील मांजरी फार्म केंद्रावर बीज प्रक्रिया करून प्रयोगशाळेमध्ये बियाणे पाठवणे.
३. एकदा की तपासणी अहवाल अचूक आला की त्यानंतर ३० किलो च्या पिशवीमध्ये बियाणे सीलबंद करणे.
४. मुळशी तालुक्यातील नांदे येथील गोदामात साठवणूक व्यवस्था करणे.

हेही वाचा:पेट्रोलच्या वाढत्या किंमती पासून आता दिलासा 2025-26 पर्यंत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्याचे लक्ष्य

विक्री व्यवस्थापन.

नांदे येथील कंपनीच्या विक्री केंद्रात इंद्रायणी वाणाचे बियाणे विक्री करण्यासाठी उपलब्ध केलेले आहेत. यंदाच्या वर्षी प्रक्रिया करण्याआधी ३६४ क्विंटल तर प्रक्रिया केल्यानंतर ३१० क्विंटल बियाणे तयार झाले. प्रति गोन १६५० रुपये दर आहे. बेळगाव येथील शेतकेयांकडून आता पर्यंत ३ टन बियाणांचे बुकिंग झाले आहे. तर मुळशी, मावळ, वेल्हा, भोर, हवेली, आंबेगाव या भागातील शेतकऱ्यांना दीड टन विक्री सुद्धा झाली आहे.

पारदर्शक व्यवहार :-

दरवर्षी च्या जून या महिन्यामध्ये बीजोत्पादन सभासदांची सभा घेऊन जमा खर्चाचा तपशील काढला जातो जे की या नंतर एकूण खर्च वजा करत राहिलेली रक्कम बँक खात्यामध्ये जमा केली जाते.

English Summary: Quality seeds available for Indrayani rice in Mulshi taluka, why there is demand worldwide Read more
Published on: 21 May 2022, 05:25 IST