News

शेतीस आवश्यक असणाऱ्या सगळ्या प्रकारच्या रासायनिक खते, कीटकनाशके, शेती अवजारे इत्यादींचे किमतीचा विचार केला तर दिवसेंदिवस त्यामध्ये वाढ होताना दिसत आहे. अशीच वाढ सध्या पीव्हीसी पाईप बाबत होताना दिसत आहे.

Updated on 12 April, 2021 2:01 PM IST

शेतीस आवश्यक असणाऱ्या सगळ्या प्रकारच्या रासायनिक खते, कीटकनाशके, शेती अवजारे इत्यादींचे किमतीचा विचार केला तर दिवसेंदिवस त्यामध्ये वाढ होताना दिसत आहे. अशीच वाढ सध्या पीव्हीसी पाईप बाबत होताना दिसत आहे.

पीव्हीसी पाईपचे सध्या वाढलेले दर शेतकऱ्यांचे आवाक्याच्या बाहेर गेले आहेत. पीव्हीसी पाईपचा विचार केला तर हा व्यवसाय पेट्रोलियम कंपनीशी निगडित व्यवसाय आहे.  यामध्ये रिलायन्स ग्रुप हा सगळ्यात कुठे आहे. पीव्हीसी पाईप तयार करण्यासाठी लागणारी पावडर जगभरात महाग झाल्याने तसेच रिलायन्स ग्रुपने जागतिक बाजारपेठेचा फायदा घेण्यासाठी त्याची निर्यात जोरात सुरू केल्याने भारतात याचा अभूतपूर्व तुटवडा निर्माण झाला आहे.

मागील काही वर्षांचा विचार केला तर पीव्हीसी पाईपचे भाव दुप्पट वाढले आहेत. सिंचनासाठी लागणाऱ्या पाईपच्या दरात वर्षभरात तब्बल 70 टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे.

पीव्हीसी पाईप तयार करण्यासाठी जो कच्चामाल लागतो तो प्रामुख्याने तेल उद्योगातून निर्माण होतो. जर आपल्या भारताचा विचार केला तर पीव्हीसी पाईप तयार करण्यासाठी लागणारी पावडर ही प्रमुख्याने अमेरिका आणि चीन या यासह जवळपास दोनशे देशांतून आयात केली जाते. परंतु या पावडरीचा तुटवडा हा जगभर जाणवत असून कोरोना नंतर परदेशातील हे उद्योग बंद झाले आहेत.

 

याचा सगळ्यात मोठा परिणाम हा पाईप उद्योगावर होताना दिसत आहे.  भारताचा विचार केला तर या पावडरचा पुरवठा रिलायन्स ग्रुप कडून होत असतो. मात्र जगाच्या बाजारपेठेत पावडरी चे दर वाढल्याने रिलायन्स ग्रुप ने ह्या पावडरची निर्यात वाढविल्यान पावडरीचा तुटवडा निर्माण होऊन पीव्हीसी पाईपचे दर प्रचंड वाढले आहेत.

 माहिती स्त्रोत- कृषी रंग

English Summary: PVC pipe prices doubled; A whopping 70 percent increase over the year
Published on: 17 March 2021, 08:47 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)