सध्या बाजारात जांभळे दाखल झाली आहेत. किलोमागे सहाशे ते सातशे रुपये दराने या जांभळाची विक्री केली जात आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जांभळाच्या फळांची आवक वाढल्यानंतर जांभळाचे दर कमी होण्याची शक्यता असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.
सध्या पालघर तालुक्याच्या पूर्वेकडील वैतरणा नदीकिनारच्या प्रसिद्ध बहाडोली गावची टपोरी जांभळे बाजारात दाखल झाली आहेत. याठिकाणची जांभळे प्रसिद्ध आहेत.
शेताच्या बांधावरच्या लावलेल्या जांभळाच्या झाडाला येणारी फळे काढून विकणारे बहाडोली गावातील शेतकरी कृषी विभागाच्या मार्गदर्शनात नवीन वृक्षलागवड, जांभळाचे उत्पादन आणि फळाच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी मेहनत घेत आहेत.
काय सांगता! गायीने दिला 'सिंहाच्या बछड्याला' जन्म, जबडा आणि पंजा पाहून सर्वच हैराण..
एकट्या बहाडोली गावात जांभळाच्या सहा हजार झाडांची लागवड आहे, तर नव्याने दोन हजार झाडांची लागवड केली आहे. यंदाचा हंगाम एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झाल्याने एक ते दीड महिन्यांचा हंगाम मिळणार असल्याने शेतकरी आनंदात आहेत.
शेतकऱ्यांनो काळजी घ्या! पुण्यात पावसाला सुरुवात, दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी...
वयोमान आणि उंची वाढलेल्या झाडांची छाटणी करण्याचा सल्ला कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. नवीन लागवड केलेल्या झाडांची उंचीत होणारी वाढ रोखण्यासाठी छाटणी करून झाडाचा विस्तार जमिनीला समांतर करून फळ तोडणी सोपी होईल, असे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.
पेरणी यंत्र योजनाद्वारे मिळणार तब्बल "एवढे" अनुदान, असा घ्या लाभ..
१८-० ! धनुभाऊंनी पंकजा ताईंचा अख्खा पॅनलचं पाडला, भाजपला मोठा धक्का
काय सांगता! गायीने दिला 'सिंहाच्या बछड्याला' जन्म, जबडा आणि पंजा पाहून सर्वच हैराण..
Published on: 29 April 2023, 11:16 IST