News

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक आणि त्याच परिसरात असलेल्या महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

Updated on 08 May, 2025 1:10 PM IST

अहिल्यानगर : जिल्ह्यातील चौंडी येथे होणाऱ्या मंत्रिपरिषद बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ चौंडीत दाखल झाले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रिमंडळ सदस्यांसह पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक परिसराला भेट देऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केले.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, होळकर घराण्याचे १६ वे वंशज युवराज यशवंतराव होळकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब डांगे आदींसह मंत्रिमंडळ सदस्य उपस्थित होते.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक आणि त्याच परिसरात असलेल्या महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

स्मारक परिसरात सुरू असलेले गढीचे नूतनीकरण, नक्षत्र उद्यान, संरक्षक भिंत, शिल्प, संग्रहालय, शिवसृष्टी या प्रगतीपथावरील कामांची पाहणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे निवास, स्वयंपाकघर, देवघर, ओसरी, तुळशी वृंदावन, बैठकीचे ठिकाण, धान्य साठविण्याचे ठिकाण, दरबार या स्थळांची पाहणीही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी केली. सभापती प्रा. शिंदे यांनी याबाबतची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली.

ढोलताशांच्या गजरात स्वागत

मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळ सहकाऱ्यांचे अहिल्यादेवी स्मारक परिसरात आगमन होताच धनगरी ढोल पथकाने ढोल गजर केला. सुवासिनिंनी सर्व मंत्र्यांचे औक्षण केले.

English Summary: Punyashloka Ahilyadevi Holkar saluted by Chief Minister and Council of Ministers News
Published on: 08 May 2025, 01:10 IST