News

राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी कायमच वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण योजना राबवल्या जातात. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध शेती संबंधीत बाबींसाठी अनुदान उपलब्ध करून दिलं जातं. अशाच योजनेपैकी एक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना रोपवाटिका उभारणीसाठी अनुदान देण्यात येते. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना राबवली जात आहे.

Updated on 22 October, 2023 4:07 PM IST

राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी कायमच वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण योजना राबवल्या जातात. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध शेती संबंधीत बाबींसाठी अनुदान उपलब्ध करून दिलं जातं. अशाच योजनेपैकी एक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना रोपवाटिका उभारणीसाठी अनुदान देण्यात येते. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना राबवली जात आहे. भाजीपाला उत्पादनाला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, आणि भाजीपाला पिकांची दर्जेदार व कीडरोग मुक्त रोपे निर्मिती करणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेच्या माध्यमातून रोपवाटीका उभारणीकरीता 1000 चौरस मीटरच्या शेडनेट हाऊस , पॉलिटनेलसह साहित्य खर्चाच्या 50 टक्के 2 लाख 77 हजार 500 रुपयांच्या मर्यादे पर्यंत अनुदान देण्यात येते.

या योजनेसाठी लाभार्थी पात्रता -
अर्जदाराकडे स्वत:च्या मालकीची किमान 0.40 हेक्टर जमीन असणे आवश्यक.
रोपवाटिका उभारण्यासाठी पाण्याची कायमची सोय असावी.
महिला कृषी पदवीधारक यांना प्रथम प्राधान्य असेल.
महिला गट/महिला शेतकरी यांना व्दितीय प्राधान्य असेल.
भाजीपाला उत्पादक अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी व शेतकरी गट यांना तृतीय प्राधान्य असेल.

अर्जासाठी कागदपत्रे -
७/१२ उतारा ८-अ
आधार कार्ड
बँक खाते पासबुक
जात प्रमाणपत्र
कृषी पदवी बाबतची कागद पत्रे
शेतकरी गट असल्यास नोंदणी प्रमाणपत्र .

रोपवाटिकेची उभारणी -
तालुका कृषी अधिकारी यांचे कडून पूर्व संमती मिळाल्यानंतर रोपवाटिकेची उभारणी करावी.
पूर्वसंमती मिळाल्यापासून १५ दिवसाच्या आत काम सुरु करून ३ महिन्याच्या कालावधीत काम पूर्ण करणे आवश्यक आहे.

प्रकल्प उभारणींनंतर प्रथम टप्प्याचे ६० टक्के अनुदान हे उपविभागीय कृषी अधिकारी यांनी प्रथम मोका तपासणी केल्यानंतर मिळेल. उर्वरित ४० टक्के अनुदान हे रोपवाटिकेतील रोपांची प्रत्यक्ष विक्री/उचल झाल्यानंतर मंडळ कृषी अधिकारी यांनी व्दितीय मोका तपासणी केल्यानंतर मिळेल.रोपवाटिका धारकास बियाणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडून परवाना घेणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांना फलोत्पादन प्रशिक्षण केंद्र, तळेगाव- दाभाडे, कृषी विज्ञान केंद्र, बारामती, नाशिक, जालना, कृषी महाविद्यालय, नागपूर आणि उद्यान महाविद्यालय, अकोला येथे तीन ते पाच दिवसांचे प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे.

अर्ज कुठे करावा-
योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज करावा.

English Summary: Punyashlok Ahilya Devi Holkar Nursery Scheme take advantage of this
Published on: 22 October 2023, 04:07 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)