News

जुलै व ऑगस्ट पावसाने धुवाॅंधार बॅटिंग केली. नदी-नाले ओसंडून वाहिले. धरणे, तलाव तुडुंब भरले..

Updated on 12 September, 2022 9:46 PM IST

जुलै व ऑगस्ट पावसाने धुवाॅंधार बॅटिंग केली. नदी-नाले ओसंडून वाहिले. धरणे, तलाव तुडुंब भरले.. अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकांचे, शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसानही झालंय. आतापर्यंत जोरदार कोसळणारा पाऊस सप्टेंबरमध्येही सक्रिय राहण्याची चिन्हे आहेत देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हंगामाच्या अखेरीस देशात 109 टक्के पाऊस पडू शकतो. सप्टेंबर

महिन्याच्या मध्यानंतर वायव्य भारतातून मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे. Monsoon is likely to start its return journey from northwest India after the middle of the month. या पार्श्वभूमीवर परभणीचे प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनीही सप्टेंबरमधील सुधारित हवामान अंदाज जारी केला आहे.

हे ही वाचा - पपई ,केळी,टोमॅटो आणि भाजीपाला पिकावरील व्हायरस आणि त्यांचे व्यवस्थापन

पंजाबराव डख यांनी 18 सप्टेंबरपर्यंत हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सध्या राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. राज्यात आजपासूनच (ता. 4) जोरदार

पावसाची शक्यता असून, 18 सप्टेंबरपर्यंत राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे.या ठिकाणी पावसाचा अंदाज राज्यात 8, 9 व 10 सप्टेंबर रोजी अनेक भागात अतिवृष्टी होऊ शकते. 18 सप्टेंबरपर्यंत राज्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळणार आहे. विशेषत: राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात सर्वाधिक पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ओढे-नाले भरुन वाहू

शकतात, शेतकऱ्यांनी पशूधनाची काळजी घेण्याचे आवाहन डख यांनी केलंय…सध्या खरीप पिकांना पाण्याची गरज असून, कडाक्याच्या उन्हामुळे पिकांनी माना टाकल्या आहेत. अशा वेळी पाऊस झाल्यास, या पिकांना नवसंजीवनी मिळणार आहे. मात्र, काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आला असल्याने, त्याचा पिकांना फटका बसण्याची शक्यता असल्याचे डख यांनी म्हटले आहे..

English Summary: Punjabrao Dakh's prediction regarding rain, Heavy rain will occur in 'this' place in September
Published on: 12 September 2022, 09:09 IST