News

राज्यातील शेतकरी बांधव (Farmers) तसेच उकाड्याने हैराण जनता गेल्या अनेक दिवसांपासून मान्सूनची (Mansoon) आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान पंजाबराव डख यांनी नुकताच मान्सून संदर्भात आपला अंदाज सार्वजनिक केला आहे. पंजाबराव डख (Punjabrao Dakh) यांच्या नवीन अंदाजानुसार, राज्यात 6 जूनला मान्सून राजधानी मुंबई दाखल होणार असून सात जून पर्यंत मान्सून हा महाराष्ट्रातील बहुतांशी प्रदेश व्यापणार आहे.

Updated on 06 June, 2022 2:34 PM IST

राज्यातील शेतकरी बांधव (Farmers) तसेच उकाड्याने हैराण जनता गेल्या अनेक दिवसांपासून मान्सूनची (Mansoon) आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान पंजाबराव डख यांनी नुकताच मान्सून संदर्भात आपला अंदाज सार्वजनिक केला आहे. पंजाबराव डख (Punjabrao Dakh) यांच्या नवीन अंदाजानुसार, राज्यात 6 जूनला मान्सून राजधानी मुंबई दाखल होणार असून सात जून पर्यंत मान्सून हा महाराष्ट्रातील बहुतांशी प्रदेश व्यापणार आहे.

शिवाय 15 जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होणार असल्याचा दावा पंजाबराव डख यांनी केला आहे. यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला देखील यामुळे मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

पंजाबराव डख यांनी सोलापूर जिल्ह्यात एका कार्यक्रमादरम्यान मान्सूनचा आपला सुधारित अंदाज सार्वजनिक केला आहे. कार्यक्रमादरम्यान पंजाबरावं डख साहेबांनी पावसाच्या आगमनाबाबत निसर्गातील काही संकेतांचा देखील उल्लेख केला आहे. त्यांच्या मते निसर्गात असे काही संकेत असतात ज्यांच्या मदतीने पावसाचा अंदाज सहजरित्या लावला जाऊ शकतो.

पंजाबराव यांनी सांगितलं पावसासंबंधित निसर्गाचे काही संकेत

»पंजाबराव यांच्या मते, सूर्य मावळताना सूर्याभोवती आकाश तांबड्या कलरचे दिसलं की समजायचं तीन दिवसानंतर पाऊस येणारचं.

»लाईटवर किडे, पाकुळे आले की पुढच्या तीन दिवसात पाऊस पडतो असे देखील संकेत असल्याचे डख यांनी स्पष्ट केले.

»मित्रांनो जसं की आपणांस ठाऊकच आहे मृग नक्षत्र 7 जूनला सुरु होतो. यामुळे जर 7 जुनच्या आसपास जर उभं वार सुटल आणि अशा वेळी जर झाडवरील चिमण्या धुळीत अंघोळ करायला लागल्या तर पुढच्या तीन दिवसांनी पाऊस येतो म्हणजे येतो.

»आकाशातून विमान जात असताना त्याचा आवाज आला की पुढच्या 3 दिवसात पाऊस येतो. कारण पाण्याचे ढग वर असतात.

»याशिवाय जर गावरान आंबा जर मोठ्या प्रमाणात पिकला नाही तर पाऊस पडतो असं देखील संकेत आहे.

»जून महिन्यात सूर्यावर जर तपकिरी कलर आला की पुढच्या 4 दिवसांनी पाऊस येतो असे संकेत पूर्वीपासून असल्याचे पंजाबराव यांनी सांगितले.

»ज्या वर्षी चिंचेला चिंचा जास्त लागतात त्यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त असते असं देखील यावेळी पंजाबराव यांनी सांगितले.

»सरडांनी जर आपल्या डोक्यावर लाल कलर केला की पुढट्या चार दिवसांनी पाऊस पडतो अस संकेत मानलं गेले आहे.

»घोरपडी बिळाच्या बाहेर तोंड काढून बसत असतील तर पुढच्या चार दिवसात पाऊस पडतो असं देखील पंजाबरावं यांनी यावेळी सांगितले.

English Summary: Punjabrao dakh says mansoon rain arrival indicators
Published on: 06 June 2022, 01:01 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)