हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी राज्यांमध्ये 10 ते 12 एप्रिल रोजीअसलेला हवामानाचा अंदाज वर्तवताना म्हटले की,जळगाव जिल्ह्यामध्येढगाळ वातावरण राहील व त्यासोबत तापमान46 ते 47 अंश डिग्री पर्यंत जाणार असल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांनी सावधान रहावे असे आव्हानत्यांनी केले.
ते उचंदा येथील उत्पादक शेतकरी देवानंद चिंतामण पाटील यांच्या शेतामध्ये संघवी कॉलिटी प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेड व धानुका एग्रीटेक प्रा. लि. यांच्या संयुक्तविद्यमानाने आयोजित शेतकरी मार्गदर्शन मेळाव्यात बोलत होते.
नक्की वाचा:Youtube च्यामाध्यमातून कमवा खूप पैसे, तुमच्यातील कौशल्य ठरेल तुमचा आर्थिक आधार
काय म्हणाले पंजाबराव डख?
यावेळी बोलताना ते म्हणाले की, राज्यामध्ये ढगाळ हवामानाचा अंदाज असून जळगाव जिल्ह्याचा तापमान हे शेचाळीस ते 47 अंश पर्यंत जाणार असल्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांनीअतिशय सावधानता बाळगावी.पुढे ते म्हणाले की, 10, 11 आणि 12 एप्रिल रोजी ढगाळ वातावरण असणार आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की 80 टक्के लोक आपल्याकडे शेती करतात. त्यातही 50 टक्के शेती कोरडवाहू आहे वीस ते तीस टक्के लोकांची शेती बागायत आहेत. माझ्या मते 50 टक्के लोकांच्या शेतीत उडीद, मुग, कपाशी, गहू, हरभरा, बाजरी अशा पद्धतीचे पिके घेतली जातात. यामध्ये जर पावसाने थोडा जरी उशीर केला तरी शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. परंतु तरीही कुठल्याही परिस्थितीत तोंड देण्याची ताकद बळीराजा ठेवत असतो.
बऱ्याच कंपन्या बंद पडतात परंतु शेतकऱ्याची कंपनी कधीही बंद झाली नाही आणि होणारही नाही असे देखील त्यांनी म्हटले.
पुढे म्हणाले की येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत राहणार असूनजेणेकरून शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होणार नाही.झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संघवी कॉलिटी प्रॉडक्ट प्रा लि चे संचालक नयनेश संगवी, सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट धानुका एग्रीटेक प्रा.ली.चे घनश्याम इंगळे तसेच शेतकरी देवानंद पाटील सही तर शेतकरी उपस्थित होते.
Published on: 11 April 2022, 08:11 IST