News

नवी दिल्ली- पंजाब विधानसभेची निवडणूक काही महिन्यांच्या अंतरावर येऊन ठेपली आहे. त्यापूर्वीच पंजाबमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदसिंग (amarinder singh) यांनी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याकडे आपला राजीनामा सोपविला आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी अपमानित केल्यामुळे राजीनामा देत असल्याचे व्यक्तव्य सिंग यांनी केले होते.

Updated on 19 September, 2021 10:40 AM IST

नवी दिल्ली-   पंजाब विधानसभेची निवडणूक काही महिन्यांच्या अंतरावर येऊन ठेपली आहे. त्यापूर्वीच पंजाबमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदसिंग (amarinder singh) यांनी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याकडे आपला राजीनामा सोपविला आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी अपमानित केल्यामुळे राजीनामा देत असल्याचे व्यक्तव्य सिंग यांनी केले होते.

राजकीय जाणकारांच्या मते, मुख्यमंत्री सिंग यांच्या राजीनाम्यामागे दीर्घकाळ सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे कनेक्शन दडले आहे.  

शेतकरी आंदोलन ते पक्षांतर्गत बंड जाणून घेऊया राजीनाम्यागील प्रमुख कारणे:

1. शेतकरी विधायकाला (farmer bill) विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांचे दीर्घकाळ आंदोलन सुरू आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांची मूक प्रेक्षक अशी प्रतिमा निर्माण झाली आहे. आंदोलनाला थेट स्वरुपाचा विरोध मुख्यमंत्री सिंग यांनी केलेला नाही. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना केंद्र सरकार विरोधात दबावगट निर्माण करण्यासाठी दिल्लीत आंदोलन करण्याचे सांगितले होते. तसेच शेतकरी आंदोलनावरुन पंजाबमधील परिस्थिती अशांत करू नका असेही वक्तव्य केले होते. शेतकरी आंदोलकर्त्यांना पंजाब सोडण्याचे विधानावर मोठ्या प्रमाणावर टीकेची झोड उठली होती.

 पंजाबच्या राजकारणात पदड्याआड वेगवान घडामोडी घडत होत्या. शुक्रवारी रात्री काँग्रेसने बोलविलेल्या आमदारांच्या बैठकीमुळे आपल्याविरोधात बदलाची मोहीम तीव्र झाल्याची जाणीव सिंग यांना झाली होती. काँग्रेसचे पंजाब-राज्य प्रभारी हरीश रावत यांनी बैठकीचे ट्विट केले होते आणि नवज्योत सिंग सिद्धू यांनी ट्विट शेअर केली होते.

3. स्त्रोतांनी दिलेल्या माहितीनुसार, 50 हून अधिक आमदारांनी सोनिया गांधींना ‘कॅप्टन’ यांना पदावरुन हटविण्यासाठी पत्र लिहिले होते.

4. मुख्यमंत्री अमरिंदसिग यांनी पक्षश्रेष्ठींनी विश्वासास पात्र समजले नसल्याचे विधान केले आहे. काँग्रेस आमदारांची दिल्लीत दोनदा व पंजाबमध्ये एकदा बोलविलेल्या बैठकीतून एकप्रकारे आपल्यावर अविश्वासच व्यक्त केल्याचे सिंग यांनी म्हटले होते.  

5.  

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यानंतर प्रताप सिंग बाजवा, सुनील जाखर आणि रनवीत सिंग बिट्टू यांच्या नावाची चर्चा आहे.

6.  पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदसिंग आणि काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यादोघांमध्ये खटके उडत आहेत. मुख्यमंत्री सिंग यांच्या प्रखर विरोधानंतरही नवज्योत सिंग सिद्धू यांची प्रदेशाध्यक्ष पदावर वर्णी लावण्यात आली होती. 

English Summary: punjaab cm amrinder sing connection with farmer protest
Published on: 19 September 2021, 10:40 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)