News

मटार उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. पितृपक्ष पंधरवडा सुरू होण्याच्या आधीपासूनच मटारला चांगला दर मिळत आहे. काल 28 सप्टेंबर रोजी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मटारला कमाल भाव 15000 रुपये मिळाला आहे.

Updated on 29 September, 2022 11:24 AM IST

मटार उत्पादक (Pea Growers) शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. पितृपक्ष पंधरवडा सुरू होण्याच्या आधीपासूनच मटारला चांगला दर मिळत आहे. काल 28 सप्टेंबर रोजी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मटारला कमाल भाव 15000 रुपये मिळाला आहे.

याठिकाणी काल पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केवळ दहा क्विंटल मटारची आवक झाली. यासाठी किमान भाग 7 हजार 500 तर कमाल भाव 15 हजार रुपये इतका मिळाला आहे.

चांगल्या आरोग्यासाठी मिठाचे प्रमाण किती असावे? जाणून घ्या सविस्तर

इतर भाजी-पाल्यांचे दर

इतर भाजीपाल्यांचे कमाल बाजारभाव पाहिले तर भेंडीला 4 हजार, टोमॅटो 2 हजार 500, घेवडा 7 हजार, दोडका 4 हजार, हिरवी मिरची 4 हजार, गवार 6 हजार रुपये असे भाव मिळाले आहेत. तर शेवग्याला 10 हजार रुपयांचा कमाल भाव आज पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळाला आहे. 

शेतकऱ्यांनो रब्बीत कमी खर्चात पिकांचे उत्पादन दुप्पट करा; फक्त 'या' टिप्स कराव्या लागतील फॉलो

पालेभाज्यांचा विचार केला तर कोथंबीर आणि मेथी या दोन्ही पालेभाज्यांना चांगला भाव मिळत आहे. कोथिंबीर शेकडा किमान भाव 700 कमाल भाव 2 हजार 500 तर मेथी शेकडा किमान भाव 1 हजार आणि कमाल भाव 2 हजार 500 रुपये इतका मिळाला आहे.

महत्वाच्या बातम्या 
शेतमाल वाहतुकीसाठी शेतकऱ्यांना मिळणार 75 टक्के अनुदान; आजच करा अर्ज
धनु आणि मकर राशींना होणार धनलाभ; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
कीटकनाशकांच्या फवारणीसाठी वापरा 'हे' अफलातून जुगाड; पैशांची होणार बचत

English Summary: Pune market committee peas maximum price 15 thousand
Published on: 29 September 2022, 11:20 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)