News

केंद्र सरकारने कडधान्यं वरील आयात बंदी पूर्णपणे उठवल्यामुळे विदेशातून कडधान्याचे आवक मोठ्या प्रमाणात होत असून, स्थानिक बाजारपेठेमध्ये कडधान्याचे दर हे हमीभावापेक्षा ही खाली आले आहेत. उडीद, मुग आणि तूर यांच्या भावात दीड ते 2हजार रुपयाची घसरण तसेच हरभराच्या दरात 600 ते 700 रुपयांची प्रतिक्विंटल घसरण झाली.

Updated on 25 May, 2021 11:04 PM IST

केंद्र सरकारने कडधान्यं वरील आयात बंदी पूर्णपणे उठवल्यामुळे विदेशातून कडधान्याचे आवक मोठ्या प्रमाणात होत असून, स्थानिक बाजारपेठेमध्ये कडधान्याचे दर हे हमीभावापेक्षा ही खाली आले आहेत. उडीद, मुग  आणि तूर यांच्या भावात दीड ते दोन हजार रुपयाची घसरण तसेच हरभराच्या दरात 600 ते 700 रुपयांची प्रतिक्विंटल घसरण झाली.

आयात बंदीचा निर्णय घेऊन एक आठवडा उलटत नाही तोपर्यंत  इतक्या मोठ्या प्रमाणात घसरण झालेली पाहायला मिळाली. हमीभावापेक्षा कमी दरात माल खरेदी केल्यास व्यापारी देखील अडचण येणार आहेत त्यामुळे धास्तावलेल्या व्यापाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देऊन आयात बंदीचा निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे.

 

कडधान्यांच्या आयातीला मागील काही वर्षांपासून मर्यादित स्वरूपात परवानगी होती परंतु केंद्र सरकारने आता आयातीला पूर्णतः परवानगी दिली आहे त्याचा परिणाम हा आवक वाढण्यात होऊन तसेच विदेशातून मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने स्थानिक पातळीवर येणाऱ्या कडधान्यांचे भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली व कडधान्याचे दर हमीभावापेक्षा ही खाली घसरले आहेत. या निर्णयामुळे  दाल मिल व्यवसायावरील परिणाम होऊ शकतो. त्यामुळे देशातील दाळमिल व्यवसाय धोक्यात येऊ शकतो.

 

केंद्र सरकारने कडधान्य आयात बंदीचा निर्णय त्वरित घ्यावा आणि होणारे संभाव्य परिणाम टाळावेत अशी मागणी देखील अनेक  संघटनांनी केली आहे. याबाबत संबंधित असोसिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी, वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर, जळगाव चे खासदार उमेश पाटील, खासदार रक्षा खडसे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निवेदन देऊन आयात  बंदीची मागणी केली.

English Summary: Pulses prices plummeted as import ban lifted
Published on: 25 May 2021, 11:04 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)