News

राज्य शासनाचा सांगली जिल्हा कृषी विभाग आणि दैनिक पुढारी माध्यम समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी प्रदर्शन शुक्रवार दि 15 ते 19 एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.

Updated on 15 April, 2022 1:05 PM IST

राज्य शासनाचा सांगली जिल्हा कृषी विभाग आणि दैनिक पुढारी माध्यम समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी प्रदर्शन शुक्रवार दि 15 ते 19 एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.

हे प्रदर्शन सांगली येथे कृषी विभाग, जिल्हाधिकारी कार्यालया मागे विजयनगर येथे 15 ते 19 एप्रिल दरम्यान चालणार आहे. सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत हे शेतकऱ्यांसाठी खुले असणार असून या प्रदर्शनाचे उत्सुकता शेतकऱ्यांमध्ये प्रचंड आहे. या प्रदर्शनाचे ऑर्बिट हे प्रायोजक आहेत. रोनिक स्मार्ट, दि कुटे ग्रुप सहप्रायोजक तर केसरी हे ट्रॅव्हल पार्टनर आहेत. प्रदर्शनाचे उद्घाटन दिनांक 15 म्हणजेच आज सायंकाळी पाच वाजता कृषी, सहकार तसेच सामाजिक न्याय व अन्न पुरवठा ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या हस्ते होणार आहे.

नक्की वाचा:भारनियमनाच्या विरोधात शेतकरी संतप्त: शेतकऱ्यांनी वीज उपकेंद्राची केली तोडफोड, दीडशे शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल

 शेतकऱ्यांना या प्रदर्शनात हे पाहता येणार

 पुढारी ॲग्री पंढरी कृषी प्रदर्शनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये ड्रोनचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहे. त्यामध्ये ड्रोनने औषध फवारणी तसेच ट्रॅक्टर ची कामे कशी होतात हे शेतकऱ्यांना बघायला मिळणार आहे.

त्यासोबतच खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, दोन पिकांमधील अंतर, सेंद्रिय शेती बद्दल मार्गदर्शन त्यासोबतच ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, ब्लोअर, रोप लावणी यंत्रा सह कृषी अवजारांचे अद्ययावत प्रकार प्रात्यक्षिकासह पाहण्यास उपलब्ध असतील. तसेच या प्रदर्शनामध्ये महाराष्ट्रातील विविध नामवंत शेती क्षेत्रातील कंपन्यांची उत्पादने स्टॉलच्या माध्यमातून पाहता येणार आहेत. प्रात्यक्षिकांसाठी लावण्यात आलेले फुले आणि फळे परिपूर्ण तयार झाले आहेत. यामध्ये कोबी, हिरवे वांगे,  स्वीट कॉर्न, काकडी, कलिंगड, पिवळी झुकिनी, ढबु मिरची, दोडका त्यासोबतच झेंडू चे वेगवेगळे प्रकार इत्यादी बऱ्याच पिकांचे या ठिकाणी लागवड करण्यात आली आहे.

नक्की वाचा:Central Government : अतिरिक्त खताच्या वापराबाबत मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय

तसेच खते, बी बियाणे, औषधे, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, पाईप लाईन, वीज आणि सोलर पंप, अनेक शेती विषयक पुस्तके व शासकीय योजना विषयी माहिती, गांडूळ खत, मल्चिंग पेपर, शेततळे कागद, मंडपासाठी लागणारी तार, रोटावेटर, पावर टिलर, ग्रास कटर, ट्रॅक्टर, दूध काढणी यंत्र, बेदाणा प्रात्यक्षिके, कडबा कुट्टी तसेच कृषी महाविद्यालय, सेंद्रिय खते, वित्तीय संस्था, दूध उत्पादक संघ, पॅकेजिंग इंडस्ट्रीज, डेअरी, प्रयोगशाळा इत्यादी अनेक प्रकारचे स्टॉल या प्रदर्शनात शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहेत.

English Summary: pudhari agri pandhri agriculture exihibition start from today at sangali
Published on: 15 April 2022, 01:05 IST