News

मराठवाड्यातील ३५ सिंचन प्रकल्पात सुधारित मान्यता देण्यात आली आहे. यामुळे मराठवाडयात मोठ्या प्रमाणावर जलसिंचन होणार आहे. तसंच शेतीला पाणी पाहिजे, जमिनीला पाहिजे ही भावना ठेवून ३५ सिंचन प्रकल्पाला सुधारीत प्रशासकीय मान्यता दिली.

Updated on 16 September, 2023 6:29 PM IST

Marathawada News :

मराठावाडा मुक्ती संग्राम दिनाच्या मुहूर्तावर सरकारने मराठावाड्यातील जनतेसाठी मोठी घोषणा केली आहे. राज्य सरकारच्या आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत मराठवाड्याच्या विकासासाठी मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. मराठवाड्यातील सिंचनावर कोट्यवधीची तरतूद करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

मराठवाड्यातील ३५ सिंचन प्रकल्पात सुधारित मान्यता देण्यात आली आहे. यामुळे मराठवाडयात मोठ्या प्रमाणावर जलसिंचन होणार आहे. तसंच शेतीला पाणी पाहिजे, जमिनीला पाहिजे ही भावना ठेवून ३५ सिंचन प्रकल्पाला सुधारीत प्रशासकीय मान्यता दिली. यामुळे ८ लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

तसंच ११ जलसंपदा प्रकल्पांना मान्यता बैठकीत देण्यात आली असून १३ हजार ६७७ कोटींचा सुधारित वाढीव खर्च मंजूर करण्यात आला आहे. मराठवाड्याच्या विकासासाठी एकूण ४६ हजार ४५३ कोटी ९० लाख खर्च करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, मराठवाड्यात विकास कामे, योजनांसाठी ३७ हजार १६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. आजच्या कॅबिनेटमध्ये मराठवाड्यासाठी ९ हजार ४३७ कोटी ९० लाख खर्चाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

English Summary: Provision of crores by the government for irrigation in Marathwada
Published on: 16 September 2023, 06:29 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)