1. बातम्या

टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजाराची तत्काळ मदत द्या – सदाभाऊ खोत

रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत

रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत

राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांच्या नशिक जिल्ह्यात तसेच राज्याचे अन्न नागरी, पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदार संघामधील येवल्यात टोमॅटोचा रस्त्यावर लाल चिखल झाला आहे. देशांतर्गत मागणीच्या तुलनेत आवक अधिक येत असल्यामुळे राज्यभरात टोमॅटोला मातीमोल भाव मिळाला आहे.

कमी भाव मिळत असल्याने संतप्त टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकत आहेत. दिवसेंदिवस टोमॅटोचे भाव कोसळत चालल्याने शेतकऱ्याला येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २० किलोच्या कॅरेट टोमॅटोला भाव २० ते ३० रुपये मिळाले. म्हणजेच एका किलोला जवळपास १ ते दीड रुपये इतका मातीमोल बाजार भाव मिळाला आहे.

हेही वाचा : टोमॅटो शेती : भरघोस उत्पन्नासाठी करा योग्य व्यवस्थापन

यावरुन रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारला इशारा दिला. ‘टोमॅटोचे भाव खूप कोसळले आहेत. वाहतूकही परवडत नाही. सरकारने ठरवावे आणि भाव द्यावा. निव्वळ घोषणांचा पाऊस पाडू नये. राज्य सरकारनं सर्कस बनू नये आणि शेतकऱ्यांसमोर विदूषक म्हणून नाचू नये. शेतकऱ्याला आत्महत्या करण्यास भाग पाडू नका. तुम्हाला फायटर म्हणून पाठवलं नाही, प्रश्न सोडवण्यासाठी पाठवले आहे. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजाराची तत्काळ मदत द्या. सरकारने लक्ष दिले नाही तर आंदोलन करू, असा इशाराही सदाभाऊ खोत यांनी नाशिकमध्ये बोलताना दिला.

 

अचानक भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. मात्र, सरकार आणि विरोधक दुसऱ्याच गोंधळात व्यग्र आहेत. त्यांनी तो गोंधळ थांबवून ताबडतोब या प्रश्नात लक्ष घालून शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे. कोल्ड स्टोअरेज, प्रक्रिया उद्योग यांना चालना देऊन टोमॅटोला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे धोरण घेतले पाहिजे. लाखो रुपये खर्चून पिकविलेला टोमॅटो फेकून देण्याची वेळ आली आहे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters