News

भारत देशातील पहिले कृषी विद्यापीठ म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी जि. अहमदनगर याची ओळख आहे.

Updated on 15 January, 2022 10:24 AM IST

भारत देशातील पहिले कृषी विद्यापीठ म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी जि. अहमदनगर याची ओळख आहे. 

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने एक आदर्श उपक्रम सुरू केला आहे.वमहात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांच्या संकल्पनेतून कृषी विद्यापीठाचा ‘आयडॉल’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. 

या उपक्रमा अंतर्गत, विदयापीठातील प्रगतशील शेतकरी, कृषी विद्यालयातून पदवी घेऊन, यशस्वी कृषी उद्योजक इत्यादींचा परिचय करून देणारे फलक (माहिती फलक) विदयापीठाच्या प्रवेशद्वारावर आणि कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राच्या दर्शनी आवारात लावण्यात आले आहेत.  

कृषी विद्यापीठ आयडॉल म्हणून जानेवारी 2022 मध्ये राहुल रसाळ व डॉ.  स्वप्नील बच्छाव यांची निवड झाली आहे. राहुल रसाळ व डॉ.  स्वप्नील बच्छाव यांची माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत.  

राहुल रसाळ हे निघोज तालुक्यातील शिववाडी गावचे रहिवासी आहेत. त्यांनी शेतात संपूर्ण यांत्रिकीकरणाचा वापर केला आहे. व ठिबक सिंचन, स्वयंचलित हवामान केंद्र आणि हवामान डेटा संकलन केंद्रावर आधारित रासायनिक अवशेष मुक्त शेतीचा वापर केला आहे. 

English Summary: Proud! Rahuri Agricultural University's 'Adarsh' project started
Published on: 10 January 2022, 06:17 IST