News

खरीप हंगाम 2020-21 मधील खरेदी केलेल्या धानासाठी आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत केंद्र शासनाने निश्चित केलेल्या दराव्यतिरिक्त धान उत्पादक शेतक-यांना प्रोत्साहनासाठी प्रती क्विंटल सातशे रूपये देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे उपस्शित होते.या केंद्र शासनाच्या निर्णयामुळे 1400 कोटी रूपये खर्च येईल.

Updated on 27 November, 2020 11:24 AM IST

खरीप हंगाम 2020-21 मधील खरेदी केलेल्या धानासाठी आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत केंद्र शासनाने निश्चित केलेल्या दराव्यतिरिक्त धान उत्पादक शेतक-यांना प्रोत्साहनासाठी प्रती क्विंटल सातशे रूपये देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे उपस्शित होते.या  केंद्र शासनाच्या निर्णयामुळे 1400 कोटी रूपये खर्च येईल.

केंद्र शासनाने धानाची आधारभूत किंमत खरेदी योजनेत खरीप हंगाम 2020-21 साठी 1868 रूपये व ग्रेड धानासाठी 1888 रूपये इतकी निश्चित केली आहे. हा निर्णय धान उत्पादक शेतकरी अडचणीत असल्यामुळे प्रोत्साहनासाठी राशी देण्याचा निर्णय घेण्यात आला. फक्त ऑनलाईन खरेदी होणा-या धानासाठीच ही राशी देण्यात येईल.तरी या वर्षी 1 कोटी 78 लाख क्विंटल इतके अपेक्षित धान्य खरेदी होईल.

शुक्रवारपासून कापूस खरेदी केंद्रे सुरू होतील.

संपुर्ण राज्यात कापूस खरेदी केंद्रे सुरू करून त्यांच्यामार्फत कापूस खरेदीस सुरूवात होत आहे. या विषयावर मंत्रिमंडळ बैठकीत पणन विभागाने प्रधान सचिव यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक महासंघाने पहिल्या टप्प्यामध्ये शुक्रवार दिनांक 27 नोव्हेंबर 2020 पासून एकुण 16 कापूस उत्पादक जिल्ह्यातील 21 केंद्रामध्ये तसेच 33 जिनिंग मिलमध्ये कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे.

दुस-या टप्प्यामध्ये प्रतिसाद न मिळालेल्या बीड, परभणी आणि जळगाव या 3 जिल्ह्यात 9 कापूस खरेदी केंद्रे डिसेंबर 2020 महिन्यातील पहिल्या आठवड्यामध्ये सुरू होणार आहेत.या वर्षी कापूस पेरा 42.86 लक्ष हेक्टरमध्ये झालेला असून एकूण 450 लक्ष क्विंटल पर्यंत कापूस उत्पादन होण्याची शक्यता आहे. या विषयी केंद्रीय कापूस खरेदी निगम (CCI) आणि महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक महासंघ यांच्या कडून खरेदीचे तंतोतंत नियोजन करण्यात आले आहे.

English Summary: Production products produced at the rate of 700 quintals
Published on: 27 November 2020, 11:23 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)