News

पंजाब कृषी विद्यापीठाने अत्याधुनिक असे ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्र बनवले आहे. पंजाब कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या या अत्याधुनिक पेरणी यंत्रामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. या यंत्रात सुपर सिडर आणि हॅप्पी सिडर तंत्रज्ञान आहे.

Updated on 28 April, 2022 12:53 PM IST

पंजाब कृषी विद्यापीठाने अत्याधुनिक असे ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्र बनवले आहे. पंजाब कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या या अत्याधुनिक पेरणी यंत्रामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. या यंत्रात सुपर सिडर आणि हॅप्पी सिडर तंत्रज्ञानाचा समावेश आहे. या यंत्रामुळे शेतकऱ्यांच्या भातपिक अवशेषांच्या व्यवस्थापनाचा प्रश्न मार्गी लागू शकेल. पंजाब कृषी या पेरणी यंत्रासंदर्भात विद्यापीठाने जालंधर येथील होशियारपूर स्टीलसोबत सहकार्य करार केला आहे.

विद्यापीठाच्या संशोधन विभागाचे संचालक डॉ. अजमेर सिंग धाट, विद्यापीठाच्या कृषी यांत्रिकीकरण आणि जैवऊर्जा विभागाचे अतिरिक्त संचालक डॉ. गुरुसाहिब सिंग मानेस कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाचे अधिष्ठाते डॉ.अशोक कुमार यांनी या संशोधनाबद्दल डॉ. राजेश गोयल, डॉ. मनप्रीत सिंग यांचे अभिनंदन केले आहे.

ट्रॅक्टरच्या मदतीने वापरण्यात येणाऱ्या या पेरणी यंत्राद्वारे बियाणे जमिनीत अचूक ठिकाणी सोडणे सहज शक्य होणार आहे,  या यंत्रामुळे शेतकऱ्यांना अवशेषांचे व्यवस्थापन करणे सहज व सोप होईल असा विश्वास विद्यापीठाच्या कृषी सयंत्रे आणि ऊर्जा अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. महेश कुमार नारंग यांनी व्यक्त केला आहे.

 ४५ ते ५० एचपी क्षमतेच्या ट्रॅक्टरद्वारे या यंत्राचा वापर करता येणार आहे. एका तासाला ०.४ हेक्टर जमीन पेरण्याची आणि एका लिटर इंधनात ५ एकर जमीन पेरण्याची या यंत्राची क्षमता आहे. असे त्यांचे म्हणणे आहे.

विद्यापीठमध्ये अनेक संशोधने होत असतात, विद्यापीठात होत असलेल्या विविध संशोधनासाठी २८९ संस्था, कंपन्यांसोबत असे सहकार्य करार केले असल्याचे माहिती पंजाब कृषी विद्यापीठाच्या संशोधन विभागाच्या विपणन संचालक डॉ. उषा नारा यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या
एका सायकलची किंमत हिरो स्प्लेंडर मोटरसायकलच्या बरोबर असेल तर! हो त्याच किमतीची सायकल केटीएमने केली भारतात लॉन्च
सिगारेटचे व्यसन आहे नुकसानदायी; जर तुम्हाला सोडायचं असेल हे व्यसन तर घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

English Summary: Production of sowing machine by Punjab Agricultural University
Published on: 28 April 2022, 12:53 IST