News

यावर्षी सोयाबिनच्या उत्पादनात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात घट झाल्याने सोयाबीनचा पुरवठा हवा तेवढा होत नाहीये. सोयाबीनच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन तेजीत असल्याने चीनमधील आयात थांबले आहे

Updated on 20 February, 2022 10:54 AM IST

यावर्षी सोयाबिनच्या उत्पादनात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात घट झाल्याने सोयाबीनचा पुरवठा हवा तेवढा  होत नाहीये. सोयाबीनच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन तेजीत असल्याने चीनमधील आयात थांबले आहे

त्यामुळे चीनमधील प्रक्रिया उद्योगांना सोयाबीनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत असल्यामुळे घेतले प्रक्रिया उद्योग येथे तीन महिन्यांपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. चिनी सरकारकडून साठा बाजारामध्ये केव्हा उपलब्ध होईल याकडे चे उद्योगाचे लक्ष लागले आहे.

 आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीन ची स्थिती

 जर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा विचार केला तर सोयाबीनचे दर हे तेजीत आहे. चीनला  सर्वात मोठा सोयाबीनचा पुरवठा हा ब्राझील कडून होतो. परंतु या वर्षी ब्राझीलमध्ये उत्पादन घटल्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये तेथील उत्पादन कमी राहण्याची शक्यता आहे. याचा परिणाम ब्राझीलमध्ये सोयाबीनचा दर मोठ्या प्रमाणात वाढले असून याचा लाभ अमेरिकेतील बाजारालाही होत आहे.या सर्व गोष्टींमुळे वाहतुकी सह, विमा आणि इतर करताना सोयाबीन आयात अतिशय महागडी ठरताना दिसत आहे परिणामी सोयाबीन आयात दारांना हवा तेवढा नफा मिळत नसल्याने तसेच चीनमधील सोयाबीन गाळप मार्जिन कमी झाली किंवा तोट्यात जात आहे. त्यामुळे ब्राझील सोबत असलेल्या आयातीचे करार चिनीआयात दारांनी रद्द केले आहेत.

त्याचा थेट परिणाम हा चीन मधील सोयाबीन प्रक्रिया उद्योग होत असून चीनमधील प्रक्रिया उद्योगांना सोयाबीनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे चीनच्या उत्तर आणि दक्षिण भागातील काही प्लांट्स बंद पडले आहेत व पडण्याच्या मार्गावर आहेत. सोयाबीनची मागणी ही मुख्यत्वे सोयापेंड निर्मितीसाठी असते. मात्र डिसेंबर महिन्याच्या मध्यापासून सोय पेंडचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे प्रक्रिया उद्योग अडचणीत आले आहेत. त्यामुळे चालू हंगामातील सोयाबीन खरेदी थांबवली असून पुढील हंगामातील करार करणे सुरू केले आहे. तसेच सध्या चीनमधील प्रक्रिया उद्योगांकडे सोयाबीनचा अत्यल्प साठा शिल्लक आहे. चीनमधील ग्रेन्स अँड ऑइल इन्फॉर्मेशन सेंटर ने दिलेल्या माहितीनुसार चीन मधील सोयाबीन चा साठा मागील आठवड्यापर्यंत 39.5लाख टनांवर  आला होता. 

हा साठा 2021 मध्ये याच काळातील उपलब्ध सोयाबीनच्या तुलनेत 15 लाख टनांनी कमी आहे. जर चीनमधील ग्वाँगझी प्रांतातील विचार केला तर तेथे अवघ्या दोन प्रक्रिया प्लांट्स कडे सध्या सोयाबीनचा साठा शिल्लक आहे. त्यामुळे आता बाजारातून सोयाबीन खरेदी करणे अशक्य होत असल्याने आता चिनी सरकारच्या साठ्याकडे  प्रक्रिया उद्योगांचे लक्ष लागले आहे.त्यातील उद्योग आणि बाजार सरकारच्या निर्णयाकडे डोळे ठेवून आहेत.( संदर्भ- ॲग्रोवन )

English Summary: processing unit shut in china due to adaquate supply of soyabioen
Published on: 20 February 2022, 10:54 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)