News

चिखली- मागील महिन्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे काही शेतकऱ्यांच्या शेतातील खांब झुकले होते. तुटले होते यामुळे विजेच्या समस्या निर्माण झाल्याने शेतकऱ्यांसह स्वाभिमानीचे विनायक सरनाईक यांनी शेतकऱ्यांच्या विद्युत समस्या सोडवण्यात याव्यात, मेंन्टेन्सची कामे तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी महावितरणाकडे केली होती.

Updated on 25 May, 2021 9:05 PM IST

चिखली- मागील महिन्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे काही शेतकऱ्यांच्या शेतातील खांब झुकले होते. तुटले होते यामुळे विजेच्या समस्या निर्माण झाल्याने शेतकऱ्यांसह स्वाभिमानीचे विनायक सरनाईक यांनी शेतकऱ्यांच्या विद्युत समस्या सोडवण्यात याव्यात, मेंन्टेन्सची कामे तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी महावितरणाकडे केली होती.

दरम्यान या मागणीची दखल महाविरणकडून घेतली गेली असून या समस्या सोडवण्यात आल्या असल्याने शेतातील तुटलेले खांब बदलून शेतात तुटलेले विद्युत वाहक तार ओढले गेल्याने शेतीचा विद्युत पुरवठा सुरळीत झाला आहे. पेरणीचे दिवस तोंडावर आले असल्याने शेतकरी शेती मशीगतीचे कामे करीत आहे.यातच मागील महिन्यामध्ये झालेल्या वादळी वाऱ्यामुळे,शेतातील विजप्रणालीचे अनेकांच्या शेतातील खांब झुकले होते.

काहीच्या शेतात खांब तुटून पडले होते. विद्युत प्रवाह असलेल्या तारं खाली जमिनीलगत लटकलेली असल्याने शेतकऱ्यांस शेती मशागतीच्या कामास ही समस्या अडसर करणारी ठरत असल्याने व अनुचीत प्रकार घडू नये, अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने या शेतकऱ्यांना भेडसावत असलेल्या समस्यांची बाब लक्षात घेऊन तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात पडलेले खांब सुरळीत करावे, तुटलेले खांब, झुकलेले खांब सरळ करावे, मेन्टेन्सची कामे तातडीने पूर्ण करण्यात यावे,जळालेले रोहित्र बदलण्यात यावे, विद्युत जोडणी अभावी बंद असलेले रोहित्र सुरू करण्यात यावे, यासह मंजुर असलेले नविन रोहित्र बसवण्यात यावे, यासह आदी मागण्या शेतकऱ्यांसह स्वाभिमानीचे विनायक सरनाईक यांनी महावितरणकडे केल्या होत्या.

 

या मागणीच्या अनुषंघाने तक्रारदार शेतकऱ्यांच्या शेतातील ट्रान्सफार्मर,विद्युत खांब,तुटलेल्या,लटकलेल्या तारांची पाहणी सरनाईक यांच्यासह महावितरणकडून करण्यात आली होती .याबाबत संबंधीत ठेकेदार यांना शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवणे बाबतच्या सुचना महावितरणचे उपकार्यकारी अभियंता श्री भुसारी व सहाय्यक अभियंता सवडदकर यांनी दिल्याने खंडाळा म, शिवारातील शेतकरी विलास ठेंग यांच्यासह आदिच्या शेतातील तुटलेले खांब बदलण्यात येऊन,शेती मशागतीस अडसर ठरणारे जमीनीलगत लटकलेले विद्युत तार ओढण्यात आले.

यामुळे अनेक दिवसापासूनची रखडलेली विजेची समस्या सुटली असून शेतकऱ्याचा वीज पुरवठा सुरळीत झाला असल्याने शेतकऱ्यांना न्याय मिळाला असून स्वाभिमानी विनायक सरनाईक हे शेतकऱ्यांची कामे आॅन द स्फॉट सोडवत असल्याचे यामुळे दिसून आले आहे.तर स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुक्यात शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरत आहे.

 

रखडलेली कामे पाउस पडण्यापूर्वी करा..

तालुक्यात अनेक शेतकर्याच्या शेतात खांब झुकुले आहे.यामुळे विद्युत प्रवाह तार जमिनीलगत लोकमकळत आहेत.त्या पेरणी पावसाच्या दिवसात अडसर करणार्या ठरू नये यासाठी पावसाळा लागण्यापुर्वी मेंन्टेन्सची कामे तातडीने पुर्ण करुण शेतकर्याच्या समस्या सोडवण्यात याव्यात अशी मागणी सरनाईक यांनी महावितरणकडे केली आहे.
प्रतिनिधी गोपाल उगले

English Summary: Problems of farmers due to replacement of broken power poles by MSEDCL
Published on: 25 May 2021, 09:05 IST