आता केंद्र सरकारने असंघटित कामगारांना विविध योजनांचा लाभ भेटावा म्हणून महत्वाचे पाऊल उचलले आहे. कामगारांची नोंदणी एकाच ठिकाणी व्हावी यासाठी केंद्र सरकारने ई-श्रम पोर्टल ची निर्मिती केलेली आहे. ई - श्रम पोर्टल मध्ये संघटित तसेच असंघटित कामगारांची नोंदणी करून त्यामध्ये हाताला काम आणि विविध योजनांचा लाभ असे दोन्ही उद्देश साध्य होणार आहेत. या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी महत्वाची आहे ती म्हणजे नोंदणी. ज्यावेळी नोंद होईल ऱ्यानंतर ई-श्रम कार्डद्वारे सर्व योजनांचा लाभ घेता येईल. जे कामगार असंघटित क्षेत्रामध्ये काम करतात त्यांना नोंदणी करण्यासाठी दोन पर्याय आहेत त्यामध्ये एक म्हणजे ऑनलाइन पोर्टलद्वारे नोंदणी आणि दुसरे म्हणजे सीएससी सेंटर ला भेट देऊन नोंदणी करता येणार आहे.
नोंदणीमध्ये अडचणी आल्यास या गोष्टी करा...
१. ऑनलाइन नोंद करण्याची प्रक्रिया खुप सोपी आहे मात्र त्यामध्ये काही अडचण येत असेल तर तुम्ही नोंद करताना जी कागदपत्रे आहेत ती लगेच बाजूला ठेवा, तसेच फॉर्म भरताना काही अडचण आली तर तुम्ही लगेच हेल्पडेस्क ला संपर्क साधा किंवा 14434 या टोल फ्री नंबर ला कॉल करून तुमची समस्या सांगा.
२. हेल्पडेस्क चे सर्वात विशेष वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये ९ भाषा आहे ज्यामुळे प्रत्येकाला आपापल्या सोयीनुसार बोलता येईल. तुम्ही हिंदी किंवा याव्यतिरिक्त ८ भाषा बोलून आपली समस्या तिथे मांडू शकता.
३. ऑनलाइन पद्धतीने नोंदनी करताना तुम्हाला कोणतीही अडचण आली तर दिलेल्या नंबरवर तुम्ही सोमवार ते शुक्रवार दरम्यान कॉल करू शकता मात्र रविवारी सुट्टी असल्याने तुम्हाला कोणतीही मदत मिळू शकत नाही. मात्र या ६ दिवसात तुम्ही टोल फ्री ला कधीही कॉल केला तर नक्की मदत भेटेल.
४. जर तुम्हाला फोनद्वारे तुमची समस्या मांडता येत नसेल तर तुम्ही GMS.ESHRAM.GOV.IN वरती जाऊन नोंदणी करता दरम्यान तुमच्या समस्येचे पत्र लिहावे लागणार आहे जे की तुमच्या समस्येवर लगेच तोडगा निघेल.
Published on: 28 December 2021, 12:35 IST