1. बातम्या

कृषिमालाला चांगला दर मिळण्यासाठी खासगी बाजार समित्यांची ई-नामशी जोडणी आवश्यक : पणनमंत्री सुभाष देशमुख

शासन शेतकऱ्यांप्रती संवेदनशील असून कृषिमालाला चांगला दर मिळावा यासाठी सर्व खासगी बाजार समित्यांनी ई-राष्ट्रीय कृषी बाजाराशी (ई-नाम) जोडणी करावी, असे निर्देश सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले. हिंगोली व वाशिम जिल्ह्यातील खासगी बाजार समित्यांच्या प्रतिनिधींची बैठक श्री. देशमुख यांनी आज मंत्रालयात घेतली. या बैठकीस आमदार राजेंद्र पाटणी, आमदार तानाजी मुटकुळे यांच्यासह पणन विभागाचे अधिकारी आणि खासगी बाजार समित्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

KJ Staff
KJ Staff

शासन शेतकऱ्यांप्रती संवेदनशील असून कृषिमालाला चांगला दर मिळावा यासाठी सर्व खासगी बाजार समित्यांनी ई-राष्ट्रीय कृषी बाजाराशी (ई-नाम) जोडणी करावी, असे निर्देश सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले.

हिंगोली व वाशिम जिल्ह्यातील खासगी बाजार समित्यांच्या प्रतिनिधींची बैठक श्री. देशमुख यांनी आज मंत्रालयात घेतली. या बैठकीस आमदार राजेंद्र पाटणी, आमदार तानाजी मुटकुळे यांच्यासह पणन विभागाचे अधिकारी आणि खासगी बाजार समित्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

श्री. देशमुख म्हणाले, ई-नामच्या माध्यमातून राष्ट्रीय कृषी बाजाराशी ऑनलाईन जोडणी करणे पणन विभागांतर्गतच्या कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि खासगी बाजार समित्यांना बंधनकारक आहे. खासगी बाजार समित्यांच्या समस्यांच्या अनुषंगाने बोलताना ते म्हणाले, बाजार समित्यांनी संघटितरित्या आपल्या समस्या मांडल्यास त्यावर उपाययोजना करणे शक्य होईल.

English Summary: Private Market Committees need to be connected with enam to get better rates for Agriculture Produce : Minister Subhash Deshmukh Published on: 01 August 2018, 10:17 IST

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters