केंद्र सरकार नोकरदारांसाठी लवकरच नवीन कामगार संहिता लागू करणार आहे. मात्र, सरकारने अद्याप कोणतीही निश्चित तारीख जाहीर केलेली नाही. केंद्र सरकारने सर्व राज्यांना नवीन कामगार संहिता एकाच वेळी लागू करण्यास सांगितले आहे, जेणेकरून खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना फायदा होईल. परंतु आतापर्यंत कोणत्याही राज्य सरकारने आपल्या वतीने मसुदा दाखल केलेला नाही.
४ दिवस काम ३ दिवस सुट्टी
नव्या संहितेनुसार आता खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आठवड्यातून ४८ तास काम करावे लागणार आहे. म्हणजेच आठवड्यात 5 दिवसांऐवजी तुम्हाला फक्त 4 दिवस काम करावे लागेल. यासोबतच, या कोडच्या अंमलबजावणीमुळे कर्मचाऱ्यांना टेक होम सॅलरी म्हणजेच हातातील पगारातही कपात होणार आहे.
नवीन नियमानुसार, कोणत्याही कर्मचाऱ्याचा मूळ पगार त्याच्या एकूण पगाराच्या 50 टक्के किंवा त्याहून अधिक करण्याची सरकारची योजना आहे. जर कर्मचाऱ्यांचा मूळ पगार जास्त असेल तर पीएफची रक्कम वाढेल. या नियमानुसार कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या वेळी मोठी रक्कम मिळणार आहे. त्यामुळे त्यांचे भविष्य सुरक्षित होईल.
नवीन कामगार कायद्यात दीर्घ रजेची तरतूद
सरकारने सुट्ट्यांमध्येही बदल करण्याचा विचार केला आहे. यापूर्वी खासगी कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्याला २४० दिवस काम करावे लागत होते. परंतु नवीन कामगार संहितेत १८० दिवस म्हणजे ६ महिने काम केल्यानंतर दीर्घ रजेची तरतूद आहे.
याशिवाय कर्मचार्यांना त्यांच्या वेतनासाठी आता जास्त धावपळ करण्याची गरज नाही, कारण नवीन कामगार वेतनानुसार, कर्मचार्यांना नोकरी सोडणे, बडतर्फी, छाटणी आणि राजीनामा देण्याआधी त्यांचे वेतन पूर्ण दोन दिवसांत द्यावे लागणार आहे.
Rules Change: सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री; 1 ऑगस्टपासून होणार मोठे बदल
2 वर्षांपासून नवीन कामगार संहितेची प्रतीक्षा करत आहे
आम्ही तुम्हाला सांगतो की मोदी सरकारला 2 वर्षांपूर्वी नवीन कामगार संहिता लागू करायची होती. मात्र एकमत नसल्याने सरकारने त्यावर निर्णय घेतलेला नाही. त्याच वेळी, नवीन कामगार संहितेच्या मसुद्यांमध्ये काही बदल देखील केले जात आहेत, ज्यामुळे विलंब होत आहे.
7th Pay Commission: कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! DA थकबाकीवर सरकार देणार २ लाख नव्हे तर तब्बल इतके पैसे
Published on: 30 July 2022, 02:04 IST