दुधावर प्रक्रिया करून जे पदार्थ बनत आहेत त्यामुळे दुधाच्या भावात वाढ होत आहे. दिवाळीच्या सणामद्धे खाजगी दूध चालकांकडून दुधाच्या दरात २ रुपयांनी घट करायचे चालले होते. परंतु आता लोण्याचे दर वाढले असल्याने गाईच्या दुधात २ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय खाजगी दूध डेरी चालकांकडून घेतला आहे. शेतकरी वर्ग असे म्हणतो की जैसे ठे वैसे असेच भाव आहेत. कारण मागच्या २० दिवसांपूर्वी गाईच्या दुधात २ रुपयेनी घट केली होती तेच २ रुपये आता वाढवण्यात आले आहेत.
गायीच्या दुधाला आता २६ रुपयांचा दर:-
दिवाळी च्या आधी गाईच्या दुधाचा दर २६ रुपये होता जे की त्यामध्ये २ रुपयांनी घट केली होती. मात्र दिवाळीच्या सणात दुधाला जास्त मागणी वाढल्याने लोणी आणि दूध भोकटी चे दर वाढले असल्याने खाजगी दूध चालक वर्गाकडून हा निर्णय घेण्यात आला होता. जरी आता २ रुपयांनी दुधाचे दर वाढले असले तरी मागे २ रुपयांनी घट केली होती. यामध्ये असे काय फरक पडलेला नाहीच.
खासगी व्यवसायातील स्पर्धेचाही दरावर परिणाम:-
सरकारी दूध डेरी पेक्षा राज्यात खाजगी दूध डेरिंच प्रमाण जास्त वाढले आहे. जसा दुधाचा दर्जा तसाच दुधाला दर आहे. दुधाचे जास्त संकलन करण्यासाठी खाजगी दूध डेरींमध्ये मोठी स्पर्धा वाढलेली आहे.प्रत्येक गावात कमीतकमी ३ ते ४ दूध डेरी आहेत त्यामुळे राज्यात जवळपास ७० टक्के दूध खाजगी डेऱ्या खरेदी करत आहेत. दुधाचे दर पुढच्या काही दिवसात २ रुपयांनी वाढतील असे दूधविकास सल्लागार समितीचे सदस्य प्रकाश कुतवळ यांनी सांगितले.
लॅाकडाऊन नंतर मागणीत होतेय सुधारणा:-
कोरोनाच्या काळात ना दुधाला ना दुधापासून तयार होणाऱ्या पदार्थाना मागणी होती. त्यादरम्यान ३० टक्के घट झाली आहे मात्र आता हळुवार का होईना पण मागणी मध्ये वाढ झालेली आहे. त्यामध्ये सर्वात जास्त वाढ दुधापासून तयार होणाऱ्या पदार्थांची आहे आणि त्याचा फायदा दूध संचालक वर्गाला होत आहे.
Published on: 26 November 2021, 01:45 IST