News

विद्यापीठांतर्गत खाजगी पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याबाबतची नियमावली तयार करण्यात येत आहे. या नियमावलीच्या प्रारुपास पुढील विद्यापीठ स्तरीय विद्या परिषद समिती आणि कार्यकारी परिषदेची मान्यता प्राप्त झाल्यानंतर व त्यानुसार प्रस्ताव शासनास प्राप्त झाल्यानंतर शासन मान्यतेसाठी सादर करण्यात येईल.

Updated on 18 October, 2023 11:42 AM IST

Mumbai News : पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठातील समस्या प्राधान्याने सोडविणार असल्याचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरच्या कामकाजाबाबत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रालयात आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे सचिव तुकाराम मुंडे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य भगवान सटाले यांच्यासह विभागाचे अधिकारी व विद्यापीठाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री विखे पाटील म्हणाले, विद्यापीठांतर्गत खाजगी पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याबाबतची नियमावली तयार करण्यात येत आहे. या नियमावलीच्या प्रारुपास पुढील विद्यापीठ स्तरीय विद्या परिषद समिती आणि कार्यकारी परिषदेची मान्यता प्राप्त झाल्यानंतर व त्यानुसार प्रस्ताव शासनास प्राप्त झाल्यानंतर शासन मान्यतेसाठी सादर करण्यात येईल.

दरम्यान, सहयोगी प्राध्यापक पदे भरतांना नियमात आहे त्याप्रमाणे कार्यवाही करावी. विद्यापीठ व अंतर्गत महाविद्यालयातील रिक्त पदे मंजूर आकृतीबंधानुसार भरण्याची कार्यवाही सुरू ठेवावी. विविध महाविद्यालयातील प्रक्षेत्र विकसित करणे आणि मुला मुलींसाठी नवीन वसतीगृह बांधकाम व दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देणे तसेच विद्यापीठ व अंतर्गत महाविद्यालयाच्या इमारतीच्या दुरुस्ती व देखभालीकरिता निधी मिळण्याबाबतही चर्चा करण्यात आली.तसेच पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या इतर प्रश्नांबाबतही यावेळी सकारात्मक चर्चा करण्यात आली.

English Summary: Priority will be given to solving problems in animal husbandry Minister Vikhe Patil assurance
Published on: 18 October 2023, 11:42 IST