News

मुंबई: पशुंच्या पैदास धोरणानुसार अनुवंशिक सुधारणा करुन उच्च वंशावळीपासून दूध, मांस, लोकर, अंडी यांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी प्राधान्य द्यावे, असे निर्देश पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री सुनिल केदार यांनी दिले.

Updated on 14 January, 2020 3:03 PM IST


मुंबई:
 पशुंच्या पैदास धोरणानुसार अनुवंशिक सुधारणा करुन उच्च वंशावळीपासून दूध, मांस, लोकर, अंडी यांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी प्राधान्य द्यावे, असे निर्देश पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री सुनिल केदार यांनी दिले. श्री. केदार यांच्या मंत्रालयातील कार्यालयीन दालनात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्यव्यवसाय प्रधान सचिव अनुप कुमार उपस्थित होते.

श्री. केदार म्हणाले, शेतकऱ्यांच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी भरीव तरतूद उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. अंडी, दुधाचे उत्पादन वाढीसाठी विविध योजना अंमलात आणून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल. मुख्यमंत्री फिरते पशु चिकित्सालय तत्काळ सुरु करावे तसेच पुणे येथील आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित करण्यात आलेली विषाणू व कुक्कुट लस निर्मिती प्रयोगशाळाही त्वरित कार्यान्वित करण्यासाठीच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी आयुक्त लक्ष्मीनारायण मिश्रा, अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे, सह आयुक्त डॉ. सुनिल राऊत मारे, सह सचिव मानिक गुटे आदी उपस्थित होते.

English Summary: Priority should be given to the production of milk, meat, wool and eggs
Published on: 13 January 2020, 09:22 IST