News

संवेदनशील मुख्यमंत्री शिंदे हे आपल्याला लाभलेले आहेत हे आपल्याला नाकारता येणार नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद ठाणे जिल्ह्यावर काम राहिला आहे. महायुती ही देशाच्या रक्षणासाठी आहे. ठाणे असून व भिवंडी आपल्याला विश्वासला साथ देणारे नेते हे शिवसेना मुख्यनेते हे एकनाथजी शिंदे आहेत.

Updated on 08 April, 2024 2:09 PM IST

पुणे : देशाचा व राज्याचा विकास, अस्मिता याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काम करत असून ते काम राज्यात पुढे नेण्याचे कार्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे करत आहेत. त्याचे हात आपल्याला बळकट करायचे आहेत. यासाठी आपण काम करायचे आहे असे आवाहन शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरी, कशेळी येथे शिवसेना भिवंडी लोकसभा मतदार संघातील खा.कपिल पाटील यांच्या प्रचारार्थ मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या.

संवेदनशील मुख्यमंत्री शिंदे हे आपल्याला लाभलेले आहेत हे आपल्याला नाकारता येणार नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद ठाणे जिल्ह्यावर काम राहिला आहे. महायुती ही देशाच्या रक्षणासाठी आहे. ठाणे असून व भिवंडी आपल्याला विश्वासला साथ देणारे नेते हे शिवसेना मुख्यनेते हे एकनाथजी शिंदे आहेत. त्याचबरोबर खा. श्रीकांतजी शिंदे यांचे येथे संपूर्ण लक्ष असून ठाणे जिल्ह्याच्या विकासात त्याचा मोठा वाटा असल्याचा विश्वास डॉ.गोऱ्हे यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणूक म्हणजे एक प्रकारचा सण आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी जास्तीत जास्त मतदान होईल याकडे लक्ष दिले पाहिजे असे आवाहन देखील डॉ.गोऱ्हे यांनी केले.

यावेळी उपसभापती विधानपरिषद व शिवसेनेच्या नेत्या डॉ नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षेतखाली ही भिवंडी येथील सभा संपन्न झाली. तसेच आयोजक देवानंद थळे माजी सरपंच यांनी केले होते. केंद्रीय राज्यमंत्री खा.कपिल पाटील, शिवसेना सचिव किरण पावसकर, शिवसेना प्रवक्त्या ज्योतीताई वाघमारे, पांडुरंग पाटील साहेब पालघरचे संपर्क प्रमुख, श्री राजेंद्र साप्ते, भिवंडीचे आमदार शांतारामजी मोरे, भिवंडी पूर्व तालुका प्रमुख इंद्रपालजी थळे,लोकसभा संपर्क प्रमुख अरुणजी पाटील, देवेश पाटील ठाणे जिल्हा पदाधिकारी, श्रीधरजी पाटील ठाणे जिल्हा युवा नेते, वैशालीताई थळे मनोगत व्यक्त केले.

English Summary: Prime Minister Narendra Modi is developing the country and the state cm eknath shinde
Published on: 08 April 2024, 02:09 IST