कृषी क्षेत्राच्या आधुनिकीकरणासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून भारत हा कृषी क्षेत्रात स्वयंपूर्ण होईल आणि संपूर्ण जगाचे नेतृत्व करण्यास सक्षम होईल. त्यासोबतच आयात कमी करून निर्यात वाढवण्यासाठी राज्यांनी व्यापार(ट्रेड), पर्यटन( टुरिझम) आणि तंत्रज्ञान( टेक्नॉलॉजी ) इत्यादींना चालना देण्यावर भर द्यावा असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
निती आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, सुलभ जीवनमान, पारदर्शक सेवावितरण, जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केल्यास दुर्बल ऐवजी वेगवान शहरीकरण भारताचे ताकद होईल.
नक्की वाचा:सातबारा वरील जातीवाचक नावे हद्दपार! ठरावाला जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता
तसेच खाद्य तेलाच्या उत्पादनात भारताने स्वयंपूर्ण झाले पाहिजे. कृषीत जर भारताला स्वयंपूर्ण व्हायचे असेल तर त्यासाठी कृषी, पशुसंवर्धन आणि अन्नप्रक्रिया सारख्या क्षेत्राच्या अत्याधुनिक करण्यावर भर देण्याची गरज असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
या झालेल्या बैठकीमध्ये महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली जसे की, पिकांचे विविधीकरण, डाळी व तेलबियाणे तसेच इतर कृषी मालामध्ये स्वयंपूर्णता, शालेय आणि उच्च शिक्षणात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी तसेच नागरी शासन या चार महत्त्वाच्या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.
नक्की वाचा:PM Suraksha Bima Yojana: महिन्याला फक्त 1 रुपया जमा करा; सरकार देतंय 2 लाखांचा लाभ
झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मागणी
किमान हमी भावाने सरकारद्वारे होणार्या शेतमालाच्या खरेदीची मर्यादा एकूण उत्पादनाच्या 50 टक्क्यांपर्यंत वाढवावी, अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आता शिंदे यांनी नितीआयोगाच्या बैठकीत केली तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारने पाठिंबा द्यावा असे देखील ते म्हणाले.
नक्की वाचा:भविष्यकाळ कापसासाठी 'गोल्डन' असेल का? शेतकऱ्यांना 'खुशी मिळेल कि गम',वाचा सविस्तर
Published on: 09 August 2022, 11:06 IST