News

देशात कृषी विधेयकांवरुन रणसंग्राम माजले आहे. पंतप्रधान नरेंद्री मोदी कायद्यावरील भूमिकेवर ठाम राहत शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल, हे आजच्या मन की बात कार्यक्रमात पटवून दिले.

Updated on 27 September, 2020 5:51 PM IST

देशात कृषी विधेयकांवरुन रणसंग्राम माजले आहे. परंतु  पंतप्रधान नरेंद्री मोदी कायद्यावरील भूमिकेवर ठाम राहत शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल, हे आजच्या मन की बात कार्यक्रमात पटवून दिले. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी आणि शेतपूरक व्यवसायांवर बोलताना पुणे आणि मुंबईत एका शेतकरी समूहाकडून चालवल्या जाणाऱ्या आठवडे बाजाराचे कौतुक केले आहे.

तीन ते चार वर्षांपूर्वी महाराष्ट्रात फळे आणि भाज्यांना एपीएमसी कायद्याच्या परिघातून मुक्त करण्यात आले. यामुळे महाराष्ट्रातील फळे आणि भाज्या उत्पादक शेतकऱ्यांच्या परिस्थितीत कसा बदल झाला, याचे उदाहरण आहे श्री स्वामी समर्थ फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड. हा शेतकऱ्यांचा समूह आहे. पुणे-मुंबईमध्ये शेतकरी स्वतः आठवडी बाजार भरवतात. या बाजारांमध्ये सुमारे ७० गावांमधील ४,५०० शेतकऱ्यांच्या उत्पादनांची थेट विक्री केली जाते. अडते नाहीत. ग्रामीण युवक या बाजारामध्ये खरेदी आणि विक्रीमध्ये सहभागी होतात. रोजगार मिळवतात, असे मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता 'मन की बात' रेडिओ कार्यक्रमाद्वारे संवाद साधत असतात. आज 27 सप्टेंबर रोजी देखील त्यांनी 'मन की बात' (Mann Ki Baat) कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला. यावेळी मोदी म्हणाले, देशाचे कृषी क्षेत्र, आमचे शेतकरी, हे आत्मनिर्भर भारताचा आधार आहेत. मागच्या काही काळात या क्षेत्राने अनेक बंधनातून स्वतःला मुक्त केले आहे.   मला अनेक शेतकऱ्यांची पत्रे मिळत राहतात. या क्षेत्रात कशा प्रकारे बदल होत आहेत याबद्दल ते मला माहिती देत राहतात, असे मोदी म्हणाले.

English Summary: Prime Minister Modi lauded the Pune-Mumbai weekly market
Published on: 27 September 2020, 05:51 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)