News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन संस्थेत पीएम किसान सन्मान संमेलनाचे उद्घाटन केले. यावेळी पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी 16 हजार कोटी रुपयांचा 12 वा हप्ताही जारी करण्यात आला. दिवाळीपूर्वी पीएम मोदींनी शेतकऱ्यांना ही भेट दिली आहे.

Updated on 17 October, 2022 1:21 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन संस्थेत पीएम किसान सन्मान संमेलनाचे उद्घाटन केले. यावेळी पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी 16 हजार कोटी रुपयांचा 12 वा हप्ताही जारी करण्यात आला. दिवाळीपूर्वी पीएम मोदींनी शेतकऱ्यांना ही भेट दिली आहे. यामुळे पीएम मोदींनी हप्ता जारी करताच देशातील 11 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये जमा झाले आहेत.

16 हजार कोटी एकाच वेळी जमा होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11.30 वाजता पीएम किसान सन्मान संमेलनाचे उद्घाटन करणार आहेत. या कार्यक्रमात देशभरातून सुमारे 14000 शेतकरी आणि सुमारे 1500 कृषी स्टार्टअप सहभागी होणार आहेत. यादरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांचा निधी जमा करण्यात येणार आहे.

देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात जवळपास 16000 कोटी रुपये क्षणार्धात पोहोचणार आहेत. गरीब शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे हा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा उद्देश आहे. केंद्र सरकारने दिलेल्या नमुन्यात शेतकऱ्यांचे उत्पन्न, मालमत्ता इत्यादी तपशील भरले जातात. शेतकऱ्याचे बँक खाते व इतर माहिती कृषी विभागात दिली जाते.

परतीच्या पावसाने सोयाबीनचे झाल नुकसान, 24 वर्षाच्या तरुण शेतकऱ्याने संपवल जीवन

पडताळणी पूर्ण झाल्यावर शेतकऱ्याच्या खात्यावर वर्षातून तीनदा (४ महिन्यांतून एकदा) २ हजार रुपये येतात. दरम्यान, यामध्ये अनेक शेतकरी बोगस आढळून आले आहेत. यामुळे त्यांची नावे कमी करण्यात आली आहेत. त्यांच्याकडून आता पैसे देखील वसूल केले जाणार आहेत. दरम्यान, देशभरातील शेतकरी पीएम किसान सन्मान निधीच्या 12व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होते.

अखेर त्या शेतकऱ्यांना न्याय मिळालाच! शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे खंडपीठाचे आदेश

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात हप्ता आला होता. यावेळी ऑक्टोबर महिना आहे. मात्र हप्ता आलेला नव्हता. आज पंतप्रधान किसान सन्मान संमेलनाचा शुभारंभ केला. यामध्ये अनेक शेतकरी तसेच केंद्रीय मंत्री देखील उपस्थित होते. पीएम किसान सन्मान निधी योजनेतील अपात्रांना बाहेर करण्यासाठी केंद्र सरकार पावले उचलत आहे. शेतकऱ्यांची पडताळणी वेगाने केली जात आहे. एकट्या उत्तर प्रदेशमध्ये पीएम किसान निधी योजनेचा लाभ घेणारे सुमारे 21 लाख लाभार्थी अपात्र आढळले आहेत.

महत्वाच्या बातम्या;
Diwali: या राज्यांमध्ये दिवाळीत फटाके फोडण्यावर बंदी, भरावा लागणार दंड
या 5 CNG कार दिवाळीत परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध, आत्ताच करा बुक
आता सौर उर्जेवर चालणारे एलईडी ऑटोमॅटिक दिवे बजारात, किमतीही आहे मापात..

English Summary: Prime Minister Modi farmers, Kisan Samman Nidhi deposited accounts 2 thousand
Published on: 17 October 2022, 01:21 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)