News

पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील 2019 20 या हंगामाचा खरीप पिकांच्या पीक विमा तांत्रिक कारणांमुळे रखडलेला होता . सणासुदीच्या पार्श्‍वभूमीवर प्रलंबित असलेला या पिक विमा योजनेची रक्कम शेतकऱ्यांना मिळाल्यास पुढील हंगामाच्या कृषी निविष्ठांसाठी तरतूद करता येईल.

Updated on 19 August, 2020 11:49 AM IST

 

पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील 2019 20 या हंगामाचा खरीप पिकांच्या पीक विमा तांत्रिक कारणांमुळे रखडलेला होता . सणासुदीच्या पार्श्‍वभूमीवर प्रलंबित असलेला या पिक विमा योजनेची रक्कम शेतकऱ्यांना मिळाल्यास पुढील हंगामाच्या  कृषी निविष्ठांसाठी तरतूद करता येईल. अहमदनगर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या व्यथा थेट केंद्रीय कृषी  कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांची मागील आठवड्यात नवी दिल्ली येथे भेट घेऊन त्यांच्या त्यांच्यासमोर   खासदार डॉक्टर सुजय विखे व अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक व माजी आमदार  कर्डिले यांनी  भेटून मांडल्या आणि यासंबंधीचे निवेदन  दिले.

त्यावेळेस कृषिमंत्र्यांनी संबंधित पिक  विमा कंपनीला तातडीने सूचना दिल्या. पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर  अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात  साडेबारा हजार रुपये पर्यंतचे अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पंतप्रधान पिक विमा योजनेचे योजना च्या अंतर्गत 20 19 - 20 वर्षातील खरीप हंगामातील कपाशी आणि तूर या पिकासाठी पैसे जमा झाल्याने खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांचे शेतकर्‍यांच्या वतीने आभार व्यक्त केले. 

काय आहे पीक विमा योजना 

शेतकरी मोठ्या मेहनतीने आपली शेती पिकवत असतो. परंतु निसर्गाच्या अनिश्चितीमुळे आणि लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असते. असते. पाऊस कमी झाला का पिकांचे उत्पादन कमी होत असते. तर कधी अतिवृष्टी झाल्याने पिके पाण्यात वाहून जात असतात. यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जातो. याची दखल घेत केंद्र सरकारने २०१६ मध्ये एक योजना आणली होती, या योजनेचे नाव आहे पीक विमा योजना. या योजनेतून सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करते. जेणेकरून त्यांचे उत्पन्नात एक स्थिरता येईल.  

English Summary: Prime minister Crop Insurance : Kharif season money credited to farmers' accounts
Published on: 19 August 2020, 11:49 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)