देशातील बाजारात सध्या कापसाचे दर घसरले आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. सोमवारी वायदे जवळपास १७०० रुपयांनी कमी होऊन २७ हजार ३०० रुपयांवर बंद झाले होते. मात्र आज दुपारी दोन वाजेपर्यंत वायद्यांमध्ये २०० रुपयांची सुधारणा झाली होती. कापसाचे वायदे २७ हजार ३०० रुपयांवर पोचले होते. असे असताना पुढील वर्षी दर वाढण्याची शक्यता आहे.
जानेवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात दरात सुधारणा होऊ शकते, अशा अंदाज कापूस बाजारातील (Cotton Market) जाणकारांनी व्यक्त केला.आज देशातील बाजारांमध्ये कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार ५०० ते ८ हजार ५०० रुपये दर मिळाला. तर राज्यातील बाजारांमध्ये सरासरी दरपातळी ७ हजार ६०० ते ८ हजार ३०० रुपये होती.
देशातील बाजारात मागील दोन दिवसांपासून कापूस दरात (Cotton Rate ) मोठी घट झाली आहे. बाजार समित्यांमधील दरही क्विंटलमागे ५०० रुपयाने कमी झाले आहेत. तर वायद्यांमध्ये आज काहीशी सुधारणा पाहायला मिळाली. कापूस दरावर पुढील काही दिवस दबाव राहू शकतो.वायद्यांमध्ये कापूस दर कमी झाल्यानंतर बाजार समित्यांमध्येही दरात नरमाई पाहायला मिळाली.
आता शेतकऱ्यांना फक्त मिस कॉल आणि मेसेज द्वारे मिळेल कृषी लोन, करा फक्त 'हे' काम..
सोमवारी कापूस दरात क्विंटलमागे सरासरी ५०० रुपये घट झाली होती. मात्र आज कापूस दर स्थिरावले होते. तर काही बाजारांमध्ये कापूस दरात वाढ पाहायला मिळाली. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात ख्रिसमस आणि नव वर्षानिमित्त सुट्ट्या सुरु आहेत. त्यामुळं दराची तुलना करता येत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात ४ जानेवारीपासून व्यवहार सुरु होतील.
तसंच भारतीय मध्यमांनी चीनमध्ये दाखवला त्याप्रमाणात कोरोना उद्रेक नसल्याची चर्चाही आता जोर धरु लागली. तर काही जाणकारांच्या मते, जानेवारीत चीनचे नववर्ष संपल्यानंतर येथील बाजारातून कापसाला मागणी वाढू शकते. म्हणजेच यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर वाढण्यास मदत होईल. देशातही जानेवारीच्या मध्यापर्यंत बाजारातील कापूस आवक जास्त असते.
India Post Recruitment 2023: तरुणांनो लागा कामाला! टपाल विभागात 98 हजारांहून अधिक पदांची भरती..
त्यानंतर कापूस विक्री कमी होते. यामुळे जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत कापूस बाजारातील सर्व चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर कापूस दरात सुधारणा होण्यास सुरुवात होईल, असा अंदाजही कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. यामुळे शेतकऱ्यांनी थोडे दिवस वाट बघितली तर त्यांना याचा फायदा होऊ शकतो.
महत्वाच्या बातम्या;
ब्रेकिंग! राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख उद्या तुरुंगाबाहेर येणार, राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा
शेतकऱ्यांनो तुम्हाला शेळ्यांच्या 'या' जाती माहिती आहेत का? देतात फायदेशीर उत्पादन..
गायरान जमिनीवर शेती करणाऱ्यांच्या नावे सातबारा करा, गायरान हक्क परिषदेत मागणी
Published on: 27 December 2022, 06:22 IST