पेट्रोल डिझेलचे भाव दररोज बदलत असतात. पण मागील काही दिवसामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या भावात फारसा बदल झालेला दिसुन आला नाही. मात्र इस्लाइल-हमास युद्धाचा परिणाम इंधनाच्या दरावर होईल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित असुन,दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे सुधारित भाव जाहीर केल्या जातात.
रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी अश्या अनेक घटकांवरुन पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ठरतात. आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यास भारतातही इंधनाच्या किमतींमध्ये वाढ होते. दरम्यान महाराष्ट्रातील काही शहरांत पेट्रोल डिझेलचे भाव स्थिर आहेत, तर काही शहरात हे भाव वाढलेले आहेत. तर आजचे पेट्रोल डिझेलचे भाव खालील प्रमाणे -
मुंबई
पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर.
पुणे
पेट्रोल रुपये 105.77 आणि डिझेल 92.30 रुपये प्रति लिटर.
नागपूर
पेट्रोल रुपये 106.04 आणि 92.59 डिझेल रुपये प्रति लिटर.
कोल्हापूर
पेट्रोल रुपये 106.47 आणि डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर.
सोलापूर
पेट्रोल रुपये 106.49 आणि डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर.
नाशिक
पेट्रोल रुपये 105.89 आणि डिझेल 92.42 रुपये प्रति लिटर.
ठाणे
पेट्रोल रुपये 105.97 आणि डिझेल 92.47 रुपये प्रति लिटर.
जळगाव
पेट्रोल रुपये 106.17 आणि डिझेल 92.79 रुपये प्रति लिटर.
छत्रपती संभाजी नगर
पेट्रोल रुपये 106.75 आणि डिझेल 93.24 रुपये प्रति लिटर.
Published on: 15 October 2023, 11:45 IST