गहू हे रबी हंगामातील सगळ्यात महत्त्वाचे पीक असून भारतातील बऱ्याच राज्यांमध्ये गव्हाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. प्रामुख्याने उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा या राज्यांमध्ये गव्हाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. गव्हाचे वाढत असलेले उत्पादन ही गोष्ट भारताच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे आहे
कारण येणाऱ्या दोन महिन्यांमध्ये देशातून वीस लाख टनांपेक्षा जास्तीचा गहू निर्यात केला जाणार आहे. यांनी रातीचा विचार केला तर मागील सात वर्षातील ही सर्वाधिक निर्यात असणार आहे.जागतिकगव्हाच्या बाजारपेठेचा विचार केला तर भारतीय गव्हाला जागतिक बाजारपेठेत आगळेवेगळे महत्त्व आहे. यामागचे प्रमुख कारण म्हणजे इतर देशांच्या तुलनेत भारतीय गव्हाची किंमती स्पर्धात्मक राहते. त्यामुळेच भारतीय गहू खरेदी केला जात आहे.
अमेरिकेच्या कृषी विभागाच्या परकीय कृषी सेवा विभागाने आपल्या ताज्या अहवालात नमूद केले की, भारताच्या गव्हाच्या निर्यातीचा अंदाजे 40 लाख 50 हजार टनावरून 52 लाख पाच हजार टनावर गेला आहे. भारत चांगल्या दर्जाचा आणि प्रमाणित गहू परवडणाऱ्या अशा वाजवी किमतीत पुरवत असल्याने निर्यातीसाठी नवीन सौदे सापडत आहेत.
ऑगस्टमध्ये भारताच्या गहू निर्यातीचे किमती या 19 हजार 889 रुपये आहेत. भारतातील गव्हा शेजारील देशांना निर्यात केला गेल्यामुळे मालवाहतुकीचा फायदा देखील झाला आहे. भारतातून सध्या श्रीलंका,इंडोनेशिया,,फिलिपाईन्स आणि पश्चिम आशियातील देशांना निर्यात करीत आहे.नेपाळ सारख्या देशात भारत वाहनांद्वारे गहू निर्यात करतो. इतर देशांकडून होणाऱ्या गावाच्या निर्यातीचा क्षमतेचा विचार केला तर युक्रेन आणि सोवियत युनियन च्या इतर माजी सदस्य देशांमध्ये उत्पादित गव्हाची किंमती 26 हजार 868 एवढी आहे.
नवीन निर्यात सौदे झाल्यानंतर लगेच गव्हाच्या किमती वाढतात-
कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्षाच्या पूर्वार्धात गव्हाची निर्यात 20 लाख 34 हजार टनांवर पोहोचली.ज्याची किंमत 4590 कोटी रुपये होती.बांगलादेश हा भारतीय गव्हाचा सर्वात मोठा आयातदार देश आहे.त्यानंतर श्रीलंका आणि नेपाळचा क्रमांक लागतो. एप्रिलमध्ये कापणीच्या वेळी एम एस पी पेक्षा खूपच कमी असलेल्या निर्यात सौदा मुळे गव्हाच्या किमती वाढत आहेत. कापणीच्या वेळी शेतकर्यांनी गहू पंधराशे रुपये प्रति क्विंटल दराने विकला,पण सध्या हा भाव 1950 रुपये प्रतिक्विंटल च्या आसपास आहे.( संदर्भ- मी ई शेतकरी)
Published on: 30 November 2021, 01:11 IST