News

शेती करत असताना कधी कशाला भाव येईल हे कोणीही सांगू शकत नाही. यामुळे शेतकऱ्यांना शेती कधी लखपती बनवती तर कधी हीच शेती त्यांना रडवती. आता फणसाच्या बाबतीत देखील असेल झाले आहे.

Updated on 22 February, 2022 9:50 AM IST

शेती करत असताना कधी कशाला भाव येईल हे कोणीही सांगू शकत नाही. यामुळे शेतकऱ्यांना शेती कधी लखपती बनवती तर कधी हीच शेती त्यांना रडवती. आता फणसाच्या बाबतीत देखील असेल झाले आहे. राज्यात कोकणात फणसाची शेती मोठी प्रमाणावर होती. आपल्याकडे फणसाची किंमत फार 100-200 रुपये किलो अशी असते; पण लंडनमध्ये एका फणसाला चक्क सुमारे 16 हजार रुपये किंमत मिळाली आहे. तिथल्या सर्वांत जुन्या अशा बरो मार्केटमध्ये एक फणस तब्बल 16 हजार रुपयांना विकला गेला आहे. यामुळे याची सध्या चर्चा रंगली आहे. असाच भाव जर महाराष्ट्रात मिळाला तर शेतकरी लखपती होतील.

सध्या सोशल मीडियावर फणसाची चांगलीच चर्चा आहे. याचे फोटो सगळीकडे व्हायरल झाले आहेत. उन्हाळ्यात फणसाचा हंगाम असतो. हंगामाच्या सुरुवातीला शहरी बाजारपेठेत 70 ते 80 रुपये किलो दराने, तर ग्रामीण बाजारपेठेत 40 ते 50 रुपये किलो दराने फणसांची विक्री होते. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही फणसाची मागणी वाढत आहे. झारखंडमधले फणस देशातल्या अनेक राज्यांमध्ये आणि परदेशातही पाठवले जात आहेत. येथील फणसाला मोठी मागणी आहे.

असे असताना बाहेरील देशात हे फळ पाठवणे अनेकांना नको वाटत. याचे कारण म्हणजे हे फळ मोठे असते तसेच ते खराब होण्याचा धोका देखील असतो. हे फळ आकाराने मोठे असल्याने ते खराब होते. ब्राझीलमध्ये हा फोटो व्हायरल झाल्यानंतर नागरिकांना मोठा धक्का बसला आहे. कारण ब्राझीलच्या अनेक भागात फणस फक्त 82 रुपये किलो दरानं विकला जातो. हा फोटो बघून ब्राझीलमध्ये अनेकांनी आता फणस विकून आपण कोट्यधीश होणार असे अनेकांनी म्हटले आहे. काही देशांमध्ये फणस मोठ्या प्रमाणात पिकतात. मात्र योग्य पुरवठा साखळी नसल्याने मोठ्या प्रमाणावर फणस खराब होतात.

अनेक देशांमध्ये फणस शिजवल्यानंतर मांसासारखा दिसत असल्याने त्याचा वापर वाढत आहे. त्याचे काही औषधी गुणधर्मही आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही फणसाची मागणी वाढत आहे. कोकणात मोठ्या प्रमाणावर फणस पिकवला जातो, मात्र त्याला योग्य बाजारपेठ मिळत नसल्याने शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत. मात्र चांगली प्रदेशातील बाजारपेठ निर्माण झाली तर शेतकऱ्यांना यामधून चांगले पैसे मिळतील.

English Summary: price gold has come Phanasa price Phanasa 16 thousand.
Published on: 22 February 2022, 09:50 IST