News

शेतकऱ्यांबाबत आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना याचा फायदा झाला आहे. सध्या बिहार सरकारने एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे. ही योजना म्हणजे याअंतर्गत शेतकरी आणि पशुपालकांकडून निश्चित किमतीत शेण खरेदी करण्यात येणार आहे.

Updated on 19 February, 2022 12:02 PM IST

शेतकऱ्यांबाबत आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना याचा फायदा झाला आहे. सध्या बिहार सरकारने एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे. ही योजना म्हणजे याअंतर्गत शेतकरी आणि पशुपालकांकडून निश्चित किमतीत शेण खरेदी करण्यात येणार आहे. नितीश कुमार यांचे सरकार खरेदी केलेल्या शेणापासून मिथेन वायू बनवणार असून त्याचा खेड्यापाड्यात पुरवठा केला जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. तसेच त्याचा उपयोग गावांमध्ये दिवाबत्तीसाठीही केला जाणार आहे. यासोबतच हा गॅस स्वयंपाकासाठी सिलिंडरमध्येही भरला जाणार आहे. यामुळे ही एक महत्वाची योजना मानली जात आहे.

यामध्ये शेणापासून मिथेन वायू तयार करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात प्लांट उभारण्यात येणार आहेत. राज्य सरकार लवकरच हे काम पूर्ण करण्याच्या प्रक्रियेत आहे. सध्या बिहारमध्ये गुरांची संख्या 2.5 कोटींहून अधिक आहे, ज्यामध्ये सुमारे 1.54 कोटी गायींचा समावेश आहे. यामुळे शेणाची उपलब्धता देखील मोठ्या प्रमाणावर आहे. यामुळे शेतीच्या खतासह याचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होणार आहे. नितीश कुमार सरकारने शेणापासून मिथेन वायू तयार करण्यासाठी गोवर्धन योजना सुरू केली आहे.

एका अहवालात शेतकरी आणि पशुपालकांकडून खरेदी केलेल्या शेणापासून मिथेन गॅस तयार करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक प्लांट उभारला जाईल. ही जबाबदारी एका एजन्सीला दिली जाईल. एजन्सी निवडीसाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्य सरकार 5 मार्चपर्यंत एजन्सी निवडणार आहे. यामुळे आता हे काम कोणाकडे जाणार आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना किती पैसे मिळणार हे येणाऱ्या काळात लवकरच समजेल. यामुळे शेतकऱ्यांना याची उत्सुकता लागली आहे.

यासाठी जिल्हा प्रशासन जमिनीची निवड करणार आहे. बहुतेक जिल्ह्यांमध्ये प्लांटसाठी जमीन निवडण्याचे काम सुरू झाले आहे. 2025 पर्यंत बिहारच्या सर्व जिल्ह्यांतील प्लांटमधून उत्पादन सुरू होईल, अशी माहिती समोर येत आहे. प्लांटमधून निर्माण होणाऱ्या कचऱ्यापासून वर्मी कंपोस्ट तयार केले जाईल. सेंद्रिय शेतीसाठी वर्मी कंपोस्ट हे अत्यंत महत्त्वाचे खत आहे. अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी गंगेच्या दोन्ही तीरांवर सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याची घोषणा केली होती. यामुळे आता या प्रक्रियेला आता वेग येणार आहे.

English Summary: price gold animal dung production methane gas buying farmers decision government
Published on: 19 February 2022, 12:02 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)