News

यंदा कपाशीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली असली तरी कपाशीवर पडणाऱ्या बोंडअळी (Bondali) रोगाचा परिणाम काय असतो याची कल्पना कृषी विभागाला (Department of Agriculture) सुरवातीपासूनच आहे. त्यामुळे कपाशीची (Cotton) हंगामपूर्व लागवड होऊ नये कपाशी बियाणे विक्रीबाबत निर्बंध घालण्यात आले आहेत.

Updated on 07 May, 2022 2:57 PM IST

यंदा कपाशीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली असली तरी कपाशीवर पडणाऱ्या बोंडअळी (Bondali) रोगाचा परिणाम काय असतो याची कल्पना कृषी विभागाला (Department of Agriculture) सुरवातीपासूनच आहे. त्यामुळे कपाशीची (Cotton) हंगामपूर्व लागवड होऊ नये कपाशी बियाणे विक्रीबाबत निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना थेट १ जून पासूनच बियाणे खरेदी करता येणार आहे.

शेतकऱ्यांना कपाशीच्या बियाणांसाठी (Cotton seeds) अजून एक महिन्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे. कापसाला विक्रमी दर मिळाल्यामुळे यंदा कापसाच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, कपाशीवर वाढत असलेल्या बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी हे त्रस्त आहेत. यातच हंगामपूर्व लागवड झाली तर त्याचा परिणाम हा इतर पिकावरही होणार आहे. बोंडाअळीमुळे केवळ पिकांचेच नाही तर शेतजमिनीचेही नुकसान होत.

2017 मध्ये कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे २०१८ ते २०२१ दरम्यान विविध उपाययोजना राबविण्यात आल्या होत्या. बोंडअळीचा जीवनक्रम खंडित न झाल्यामुळे हा प्रादुर्भाव वाढत आहे. हंगामपूर्व कापूस लागवड खंडित न झाल्यामुळे अळीस पोषक वातावरण निर्माण होते. त्याचा प्रादुर्भाव पुन्हा इतर पिकांवरही होतो. त्यामुळे कृषी विभागाने (Department of Agriculture) हंगामपूर्व कापूस लागवड करता येऊ नये म्हणून हंगाम संपल्यावरच कापूस बियाणे बाजारात उपलब्ध करुन दिले आहे.

डाळिंब फळ प्रक्रिया आणि फायदे...

हंगामाच्या अगोदरच बियाणे उपलब्ध झाल्यास शेतकरी त्याची लागवड करतात. म्हणून बियाणे पुरविण्याचा एक कालावधी ठरविण्यात आला आहे. ज्या ठिकाणी बियाणांची उत्पादकता होते तेथून वितरकांपर्यंत ११ ते १० मे दरम्यान बियाणे पुरविले जाणार आहे. तर वितरकांकडून १५ मे पासून किरकोळ विक्रेत्यांना पुरविले जाणार आहे तर किरकोळ विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांना १ जून नंतर विक्री केले जाणार आहेत.

आता 'या' कारणामुळे बिअरचे दर वाढणार...

English Summary: Prevent pre-season planting of cotton; Big decision of agriculture department
Published on: 07 May 2022, 02:57 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)