शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले असून वयाच्या 52 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर त्यांच्या गाडीला आज पहाटे साडेपाच वाजता झालेल्या अपघातात यांचे दुर्दैवी निधन झाले. अपघात झाल्यानंतर त्यांना पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु त्यांना तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केले. याबाबत प्राप्त माहितीनुसार, विनायक मेटे यांच्या गाडीला अनोळखी वाहनाने धडक दिल्याची माहिती समोर येत आहे.
नक्की वाचा:Har Ghar Tiranga: हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत कृषी जागरणनेही फडकवला तिरंगा
विनायक मेटे आज त्यांचे एक सहकारी आणि बॉडीगार्ड यांच्यासोबत मुंबईकडे येत असताना हा अपघात झाला.
आज दुपारी बारा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत मराठा आरक्षणाविषयी असलेल्या बैठकीसाठी ते मुंबईला येत होते. परंतु या दुःखद घटनेची माहिती मिळताच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप आमदार प्रवीण दरेकर एमजीएम रुग्णालयाच्या दिशेने रवाना झाले.
नेमका अपघात कसा झाला?
विनायक मेटे यांच्या कारला एका ट्रकने बाजूने धडक दिल्याची प्राथमिक माहिती मिळत असून " आम्ही बीड कडून मुंबईकडे येत होतो आम्हाला ट्रकने कट मारला. यामध्ये ट्रॅकच्या बंपर मध्ये कार अडकली आणि काही अंतरापर्यंत फरफटत गेली.
आमचा अपघात पाच वाजता झाला पण मदत पोहोचण्यासाठी एक तास लागला. फोन केला तेव्हा कंट्रोल रूम वरच्या कर्मचार्यांनी तातडीने प्रतिसाद न देता जवळपास सहा वाजता ॲम्ब्युलन्स आली" अशी माहिती विनायक मेटे यांचा अपघात झाला तेव्हा त्यांच्या सोबत असणारे सहकारी एकनाथ कदम यांनी दिली.
नक्की वाचा:कृषी महाविद्यालय अकोला तर्फे ‘हर घर तिरंगा मोहीम’ जनजागृती रॅलीचे आयोजन
Published on: 14 August 2022, 08:44 IST