News

हवामान विभागाने अवकाळी पावसाचा इशारा दिला होता, हिंगोली जिल्ह्यात रविवारी ता. २४ रात्री दोन वाजता मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावली, यामध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले असून बळीराजा चिंतेत आहे.

Updated on 25 April, 2022 12:06 PM IST

हिंगोली जिल्ह्यात रविवारी ता. २४ रात्री दोन वाजता मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावली, यामध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले असून बळीराजा चिंतेत आहे. हवामान विभागाने अवकाळी पावसाचा इशारा दिला होता, त्यानुसार झालेल्या अवकाळी पावसाने व सुसाट वादळी वाऱ्याने ज्वारी, हळद तसेच आंबा पिकांचे नुकसान झाल आहे. काल दिवसभर जिल्ह्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण होते.

रात्री २ दरम्यान प्रत्यक्ष पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यात २ दिवसांपासून ढगाळ वातावरण असून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. रब्बी पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.  वसमत तालुक्यातील सिरळी येथे शेतात बांधलेल्या बैलावर विज कोसळल्याने बैल दगावला आहे. पावसामुळे हिंगोली शहरासह जिल्यातील अनेक ठिकाणी विज पुरवठा खंडित झाला होता.

मागील दोन दिवसात वातावरण बदल झाला असून काही ठिकाणी दोन पावसाच्या हलक्या सरी देखील कोसळल्या होत्या. त्यानंतर रविवारी दोन वाजता विजेच्या कडकडाटात पाऊस झाला. दोन वाजता सुरू झालेला पाऊस विजेचा कडखकडात साडेपाच पर्यंत सुरू होता. मागील दोन दिवसापासून पावसाच्या सरी कोसळत असून रविवारी रात्री झालेल्या पावसामुळे तसेच आंबा, हळद व शेतात उभ्या असलेल्या ज्वारीचे नुकसान झाले आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील कंजारा भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने शेतात उभ्या असलेल्या टाळकी ज्वारी पिकांचे नुकसान झाले.

अचानक आलेल्या या पावसामुळे शेतात काढून ठेवलेल्या हळदीचे नुकसान मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आंबा पिकांचेही मोठे नुकसान झाल्याचे शेतकरी सांगताहेत. जिल्ह्यातील सर्वच भागात पावसाने हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यातील भाजीपाला पिकांचे देखील नुकसान झाले असून यामध्ये टमाटे, कोथींबीर, पालक, मेथी आदीचे नुकसान झाले आहे त्यामुळे भाज्यांचे भाव वाढण्याची शक्यता आहे.

अगोदरच रसायनिक खतांचे तसेच इंधनाचे भाव वाढले असून, शेती करणे महाग झाले आहे त्यात अशा अवकाळी पावसामुळे शेतकर्यांचे नुकसान होत असेल तर बळीराजा अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने शेतकर्यांना मदत करण्याची मागणी केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या
अखेर पीएम किसान योजनेच्या 11 व्या हप्त्याची तारीख ठरली! 'या' दिवशी होणार पैसे जमा..
टोमॅटो उत्पादकांसाठी महत्त्वाचे! पिवळा पर्णगुच्छ रोग आहे टोमॅटोवरील सर्वात नुकसानकारक, योग्य व्यवस्थापन गरजेचे

English Summary: Presence of rains with strong winds in Hingoli district, crop damage
Published on: 25 April 2022, 12:06 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)